Pune Crime News : दारूच्या व्यसनामुळे भावांचा कलह टोकाला; लहान भावाचा मोठ्या भावाकडून खून

Pune Latest Crime News : बिबवेवाडीत सोमवारी सकाळी कुटुंबीयांसमोर चाकू हल्ला; भावकीचं नातं रक्ताने माखलं
पुणे | बिबवेवाडी परिसरात दारूच्या व्यसनातून उद्भवलेल्या कौटुंबिक वादाने अखेर जीव घेतला. मोठ्या भावाने लहान भावावर चाकूने वार करून त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना सोमवारी सकाळी घडली. अनिकेत दत्तात्रय नवले (26 वय) याने प्रविण उर्फ ऋतिक नवले (24 वय) याच्यावर चाकूने हल्ला करून जिवे मारले. Pune Murder News या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. Pune Latest Crime News
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रविण नवले हा काही कामधंदा करत नव्हता आणि दारूच्या नशेत सतत कुटुंबीयांना त्रास देत होता. सोमवारी सकाळी अनिकेत त्याला समजवण्यासाठी गेला असता, वाद विकोपाला गेला. दोघांमध्ये बाचाबाची झाली आणि त्याचे रूप हाणामारीत बदलले. अनिकेतने रागाच्या भरात प्रविणवर चाकूने वार केला.
जखमी प्रविणला स्थानिक रहिवाशांच्या मदतीने तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती डॉक्टरांनी दिली. घटनेनंतर अनिकेत नवलेला अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात Pune Bibewadi Police Station खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. दरम्यान, दारूच्या व्यसनामुळे घरात फुटलेली नाती आणि हिंसाचार ही समस्या समाजासाठी गंभीर इशारा ठरत असल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.



