Pune Crime News : पुण्यातील शिक्षण संस्थेत रक्ताचे पाट! – राजगुरुनगरमधील कोचिंग क्लासमध्ये विद्यार्थ्याचा वर्गातच चाकूने भोसकून खून

Pune Latest Crime News : दहावीच्या अल्पवयीन मित्रानेच केला जीवघेणा हल्ला; जुन्या वादातून कोचिंग क्लास बनला हत्याकांडाचे ठिकाण; शैक्षणिक सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
पुणे :- पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगरमधून एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. Pune Rajgurunagar Murder News कोचिंग क्लासमध्ये शिक्षक शिकवत असतानाच, इयत्ता दहावीच्या एका अल्पवयीन विद्यार्थ्याचा त्याच्याच वर्गमित्राने चाकूने वार करून खून केल्याची भयानक घटना घडली आहे. अल्पवयीन मुलांमधील ‘गँगवॉर’सदृश या प्रकाराने राजगुरुनगर परिसरात मोठी खळबळ उडाली असून, शैक्षणिक संस्थांमधील सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. Pune Latest Crime News
वर्गातच घडला थरार
राजगुरुनगर येथील संस्कार कोचिंग क्लासेसमध्ये दुपारच्या सुमारास दहावीचा वर्ग सुरू असताना हा थरार घडला. एका अल्पवयीन आरोपी विद्यार्थ्याने अचानक आपल्या क्लासमेटवर हल्ला चढवला.आरोपीने मृत विद्यार्थ्याच्या गळ्यावर आणि पोटात चाकूने अनेक वार केले. या हल्ल्यात विद्यार्थी गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. हल्ला केल्यानंतर आरोपी विद्यार्थी तत्काळ दुचाकीवरून पळून गेला.
पोलिसांचा तपास
राजगुरुनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि मृत विद्यार्थी यांच्यात जुना वाद होता का, या दिशेने तपास सुरू आहे. हल्ला करणारे आणि मृत दोघेही अल्पवयीन असल्याने यामागील नेमके कारण आणि जुन्या वादाचा तपशील पोलीस शोधत आहेत.
या भयानक घटनेमुळे पालकवर्गात मोठी भीती पसरली आहे. अनेक पालकांनी शाळा सुटण्याच्या वेळी शाळेबाहेर मोठी गर्दी करून पाल्यांना घरी नेण्यास सुरुवात केली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शाळा आणि क्लासमध्ये कठोर सुरक्षा नियम लागू करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.



