•बीड ते ठाणे, पोलिसांचा थरारक पाठलाग; चालकाने केला होता मालकाच्या पैशांवर डल्ला
पुणे :- एखाद्या सिनेमाच्या कथेला लाजवेल अशी थरारक कामगिरी करत पुणे शहर पोलिसांच्या काळेपडळ तपास पथकाने एक मोठी चोरी उघडकीस आणली आहे. मालकाच्या लग्नमंडपाचे तब्बल 15 लाखांहून अधिक रुपयांची रोख रक्कम चोरून फरार झालेल्या चालकाच्या अखेर पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. तांत्रिक कौशल्याचा वापर करत, एकाच फोन कॉलच्या आधारे पोलिसांनी या चालाख चोराला ठाण्यातून शिताफीने अटक केली.
‘मास्टरमाईंड’ चालाख चालक पठाण
काळेपडळ पोलीस ठाण्यात बी.एन.एस. कलम 306 नुसार नोंद असलेल्या या गुन्ह्यातील मुख्य आरोपी सलमान यासीन पठाण (वय 32, मूळ रा. बीड, सध्या ठाणे) हा फिर्यादीकडे चालक म्हणून कामाला होता. त्याने मालकाच्या लग्नमंडपाच्या कामासाठी आणलेले मजुरांच्या पगाराचे पैसे गाडीतूनच चोरले आणि त्यानंतर धूम ठोकली. गुन्हा दाखल झाल्यापासून तो पोलिसांना गुंगारा देत होता.
पोलीस आणि आरोपीमध्ये ‘खेळ’ सुरूच!
सलमान यासीन पठाणने आपला मोबाईल फोन बंद करून पोलिसांचा माग काढण्यास कठीण केले होते. तो मिरज-सांगली, बीड, पुणे ग्रामीण, मुंबई, मुंब्रा, ठाणे अशा वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये आणि शहरांमध्ये आपले अस्तित्व लपवून फिरत होता. पोलीस त्याच्या मागावर गेले असता, तो पोलिसांच्या येण्यापूर्वीच तिथून पसार होत असे. विशेष म्हणजे, तो स्वतःचा मोबाईल न वापरता रस्त्यावरील अनोळखी व्यक्ती, रिक्षाचालक, कॅबचालक, हॉटेल वेटर अशा वेगवेगळ्या लोकांकडून तात्पुरता मोबाईल फोन घेऊन नातेवाईकांशी संपर्क साधत होता. त्यामुळे पोलिसांना त्याचा नेमका ठावठिकाणा मिळत नव्हता.पोलिसांचे अथक प्रयत्न सुरू असतानाच, अचानक आरोपी सलमानने त्याच्या सुरुवातीच्या एका मोबाईल नंबरवरून त्याच्या नातेवाईकांना एक फोन कॉल केला. पोलिसांसाठी हीच ‘गोल्डन संधी’ ठरली! याच एका फोन कॉलचा धागा पकडून पोलीस हवालदार प्रतिक लाहिगुडे यांनी तांत्रिक विश्लेषणाद्वारे आरोपीचे अचूक लोकेशन शोधून काढले.
माहिती मिळताच तपास पथकाचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित शेटे, पोलीस हवालदार दाऊद सय्यद, पोलीस अंमलदार शाहिद शेख आणि प्रदिप बेडीस्कर यांनी तातडीने मुंब्रा, ठाणे येथील शिळडायघर पोलीस ठाणे परिसरात सापळा रचला. आरोपीच्याच एका मित्राच्या मदतीने पोलिसांनी सलमानला अत्यंत शिताफीने ताब्यात घेतले. त्याच्याकडून चोरी केलेल्या मुद्देमालापैकी तब्बल 15 लाख 6 हजार 420 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यात रोख रक्कम, सोन्याचे दागिने, एक चारचाकी गाडी आणि मोबाईल फोन यांचा समावेश आहे.
पुणे शहर पोलीस दलाचे पोलीस उप आयुक्त (परिमंडळ-5) राजकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त (वानवडी विभाग) धन्यकुमार गोडसे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक (काळेपडळ पोलीस स्टेशन) मानसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित शेटे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही प्रशंसनीय कामगिरी केली आहे. या धडाकेबाज कारवाईमुळे चोरीचा छडा लागलाच, पण मालकालाही मोठा दिलासा मिळाला आहे.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…