क्राईम न्यूजमुंबई

Pune Crime News : महिलांना ऑनलाईन प्रेमात गंडा घालणारा भामटा जेरबंद

काळेपडळ पोलिसांची कामगिरी

पुणे :- संगम डॉट कॉम या मेट्रोमनी साइटवरून लग्नाचे खोटे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या एका तरुणाला काळेपडळ पोलिसांनी मध्यप्रदेशच्या इंदूर मधून अटक केली आहे. Pune Police News या तरुणाने महिलेचे तब्बल 45 लाखांची फसवणूक करून सातत्याने शारीरिक संबंध ठेवून लग्नाचे खोटे आमिष दाखविले होते. याप्रकरणी महिलेने काळेपडळ पोलिसांना तक्रार होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,गुन्हयाचे तपासात पाहिजे आरोपी हा सराईत गुन्हेगार असुन, तो सोशल मिडीयावर अथवा मेट्रोमनी साईटवर फेक आयडी तयार करुन, महिलांशी मैत्री व जवळीक निर्माण करुन, आपले जाळ्यात फसवुन, त्यांना लग्नाचे अमिष दाखवुन शारीरीक संबंध ठेवुन, त्याना ब्लॅकमेल करुन, त्यांचेकडुन ऑनलाईन व रोख स्वरुपात रक्कम घेवुन फसवणुक करत असलेबाबत निष्पन्न झाले व सदर आरोपी विरुध्द दिल्ली, फरीदाबाद, भोपाळ, इंदोर या ठिकाणी गुन्हे दाखल असल्याचे तपासात निष्पन्न झाले.

गुन्हयाचे तपासात गुप्त बातमीदार यांचेकडुन गुन्हयातील पाहिजे आरोपी हा इंदोर मध्यप्रदेश येथे येणार असल्याची बातमी प्राप्त झाली होती. बातमीच्या अनुषंगाने तांत्रिक तपास करुन, वरिष्ठांचे पूर्व परवानगी घेवुन, काळेपडळ पोलीस ठाणेकडील तपास पथक इंदोर येथे जावुन, स्थानिक पोलीस मदतीने व तांत्रिक तपसावरुन आरोपीला अटक केली आहे.अमन प्रेमलाल वर्मा (वय 38 रा. जि. जम्मू काश्मिर) अटक आरोपीचे नाव आहे. आरोपीला अटक करुन न्यायालयात रिमांड कामी हजर केले असुन, 10 फेब्रुवारी 2025 रोजी पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मिळाली असुन, गुन्ह्याचा पुढील तपास विलास सुतार, सहा‌य्यर पोलीस निरीक्षक, काळेपडळ पोलीस ठाणे पुणे शहर हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0