Pune Latest Crime news : माहिती देणाऱ्यावरच दगड-लाकडी दांडक्यांनी हल्ला,पोलिस तपास सुरू; मावळ तालुक्यात घडली धक्कादायक घटना
पुणे | बेकायदेशीर पिस्तुलाची माहिती पोलिसांना दिल्याचा सूड घेत, एका व्यक्तीवर दगड व लाकडी दांडक्याने हल्ला केल्याची घटना मावळ तालुक्यातील कातवी गावात घडली. या हल्ल्यात अशोक रघुनाथ चव्हाण (वय 49) हे गंभीर जखमी झाले असून, त्यांनी तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात Pune Talegaon MIDC Police Station फिर्याद दिली आहे. Pune Latest Crime News
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोक चव्हाण यांनी आरोपीकडे बेकायदेशीर पिस्तुल असल्याची माहिती पोलिसांना दिली होती. या माहितीवरून पोलिसांची कारवाई होण्याची भीती असलेल्या आरोपीने चव्हाण यांच्यावर राग धरून थेट त्यांच्या जीवावर उठण्याचा प्रयत्न केला.
आरोपीने लाकडी दांडक्याने तसेच दगडाने अशोक यांच्या डोक्यावर व हातावर प्रहार केला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात घबराट पसरली. जखमी अवस्थेत अशोक यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दरम्यान, तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात संबंधित आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पुढील तपास सुरू आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यास सुरुवात केली आहे. या प्रकारामुळे परिसरात तणावाचे वातावरण आहे.
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…
Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…
Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…
Pune Swargate Case : पुणे पोलिसांचा ऐतिहासिक तपास | अश्लील व्हिडिओची गुगल हिस्टरी आणि बसमधील…
Rohit Pawar On DGCA And Central Minster : व्हीएसआर कंपनीला वाचवण्यासाठी दिल्लीतून हालचाली? | 28…