•ग्रामसेवकाला पाच हजाराची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून रंगेहाथ पकडले
पुणे :- वरसगांव ग्रामपंचायत कार्यालय, ता. वेल्हा, जि. पुणे येथील ग्रामसेवकावर लाच स्विकारला प्रकरणी कारवाई करण्यात आली आहे.वरसगांव ग्रामपंचायत ग्रामसेवक विठ्ठल वामन घाडगे (44 वर्ष) 8 अ उतारावरील नाव दुरुस्ती करण्यासाठी प्रकरणी तक्रारदार यांच्याकडून पाच हजाराची लाच मागितली होती.
तक्रारदार यांचे मौजे वरसगांव ता. वेल्हे, जि. पुणे येथे वडीलोपार्जीत मिळकत घर क्र. 25 व घर नं. 26 आहे. सदर मिळकतीच्या क्षेत्राच्या नोंदी दुरुस्त करून, मिळकत घर नं. 25 च्या 8 अ उता-यावर तक्रारदार यांचे आईचे व मिळकत घर नं. 26 च्या 8 अ उता-यावर तक्रारदार यांचे स्वतःचे नाव दुरुस्त करुन संगणीकृत 8 अ चा उतारा देणेसाठी लोकसेवक विठ्ठल घाडगे यांनी 5 हजार रुपयांची लाच मागणी केल्याची तक्रार तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागा येथे दिली होती.
तक्रारीची पडताळणी पंचासमक्ष केली असता, लोकसेवक विठ्ठल वामन घाडगे यांनी तक्रारदार यांचेकडे त्यांचे मिळकत घर क्र. 25 व 26 च्या 8 अ उता-यावर आईचे व तक्रारदार यांचे नावाची नोंद घेण्यासाठी व संगणीकृत उतारा तक्रारदार याना देण्यासाठी पंचासमक्ष 5 हजार रुपयाची लाच रक्कमेची मागणी करुन, ग्रामसेवक विठ्ठल घाडगे यानी तक्रारदार यांचेकडून रुपये पाच हजार रुपये लाच रक्कम पंचासमक्ष स्विकारल्यावर त्याना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांचेविरुद्ध वारजे माळवाडी पोलीस स्टेशन, पुणे येथे वरील प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे येथील पोलीस निरीक्षक विद्युलता चव्हाण तपास करीत आहेत.
पोलीस उप आयुक्त/पोलीस अधीक्षक अमोल तांबे ला.प्र.वि. पुणे परिक्षेत्र, मा. अपर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे, ला.प्र.वि. पुणे यांचे मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…