- वपोनि महेश बोळकोटगी यांची धडाकेबाज कामगिरी
- येरवडा येथील गुन्ह्यात फरार होता आरोपी
पुणे, दि. ३ सप्टेंबर, मुबारक जिनेरी (महाराष्ट्र मिरर) Pune Crime News
सुधीर गवस याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी येरवडा हद्दीत साथीदारांसह कोयते घेऊन खुनाचा प्रयत्न करणाऱ्या अट्टल गुन्हेगार ‘भोऱ्या’ यास चतु:शृंगी पोलिसांनी मोठ्या शिफातीने जेरबंद केले आहे. पोलीस उपायुक्त परिमंडळ 4 पुणे शहर हिम्मत जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त खडकी विभाग श्रीमती अनुजा देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी व तपास पथकाकडून कामगिरी करण्यात आली आहे. Pune Crime News
दि. ३ रोजी तपास पथकातील अधिकारी व अंमलदार हे पोलीस स्टेशनचे हद्दीमध्ये गस्त करत असताना सपोनी नरेंद्र पाटील यांना आरोपी भोऱ्या शिंदे हा सोमेश्वरवाडी पाषाण पुणे येथे आला आहे अशी माहिती मिळाली. याबाबत चतु:शृंगी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी यांनी कायदेशीर कारवाई करण्याबाबत तपास पथकाला रवाना केले.
सपोनि नरेंद्र पाटील, पो हवा दुशिंग, पो शि पालांडे, पो शि भांगले, पो शि खरात व पो शि तरंगे यांनी सोमेश्वर वाडी पाषाण पुणे येथे सापळा रचून इसम नामे रोहित उर्फ भोऱ्या मधुकर शिंदे, वय 21 वर्ष रा. दुसरा कॅनॉल, पांढरस्थळ, गणपती मंदिराजवळ, उरळीकांचन, पुणे यास शिताफीने पाठलाग करून ताब्यात घेतले. नमूद आरोपीने त्याचा गुन्हेगार मित्र सुधीर गवस याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी त्याच्या इतर साथीदारांसह हातामध्ये कोयते घेऊन येरवडा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जाऊन खुनाचा प्रयत्न केला होता. त्याबाबत येरवडा पोलीस स्टेशन पुणे शहर येथे गु र क्र ४९०/२०२४ भारतीय न्याय संहिता कलम १०९,३२४(४),३(५) सह आर्म ॲक्ट कलम ४(२५) सह क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ऍक्ट कलम ३,७ अन्वये गुन्हा दाखल आहे. नमूद आरोपी हा गुन्हा दाखल झाल्यापासून सदरचा फरार होता. आरोपीला गुन्ह्याच्या पुढील तपासकामी येरवडा पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. आरोपीवर गंभीर दुखापत, खुनाचा प्रयत्न, खंडणी इत्यादी गुन्हे दाखल आहेत.
सदरची कामगिरी ही Pune Police पोलीस आयुक्त, पुणे शहर अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त पुणे शहर रंजन कुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग मनोज पाटील, पोलीस उपायुक्त परिमंडळ 4 पुणे शहर हिम्मत जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त खडकी विभाग श्रीमती अनुजा देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी चतुशृंगी पोलीस स्टेशन, पोलीस निरीक्षक गुन्हे युवराज नांद्रे, स. पो. नि. नरेंद्र पाटील व तपास पथकातील अंमलदार पो हवा दुशिंग, पवार, पो शि पालांडे, भांगले, खरात, तरंगे, मपोशि कुंभार यांनी केली आहे.