Pune Crime News : लाचलुचपत प्रतिबंध विभागाची कारवाई ; आर.टी.ओ एजंटला लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले
•20 हजाराची लाच मागितली होती, लाचलुचपत प्रतिबंध विभागाने सापळा रचून आरटीओ एजंटला केले अटक
पुणे :- आरटीओ पुणे आणि पिंपरी चिंचवड यांच्याकडून ओव्हरलोडींग कारवाई न करण्यासाठी प्रत्येक गाडीने चार हजार एकूण पाच गाड्या असे वीस हजार रुपये द्यावे लागेल असे आरटीओ एजंट जावेद अकबर शेख (33 वर्ष) याला वीस हजाराची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंध विभाग ठाणे यांनी रंगेहाथ अटक केली आहे. Pune Crime News
तक्रारीच्या अनुषंगाने पंचासमक्ष पडताळणी केली असता आरोपी जावेद अकबर शेख याने तक्रारदार यांच्याकडे लाचेची मागणी केल्याने निष्पन्न झाल्याने अँन्टी करप्शन ब्यूरो, ठाणे विभागाने सापळा कारवाई करून काल (6 मार्च) रोजी खाजगी एजंट यांनी तक्रारदार याच्याकडून वीस हजाराची लाचेची रक्कम स्विकारतांना आर.टी.ओ. पुणे यांने वाहन चाचणी केंद्र दिवे ता. पुरंदर जि.पुणे येथील मोकळया आवारात रंगेहात पकडण्यात आले आहे. एजंट विरुध्द कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. पोलिसांकडून देवेंद्र खिवसरा, गिरीश भोगळे, भावड्या चौधरी या आरटीओ एजंट चा पोलीस शोध घेत आहे.
लाचलुचपत प्रतिबंध विभाग ठाणे, पोलीस अधीक्षक सुनील लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. Pune Crime News