क्राईम न्यूजपुणे
Trending

Pune ACB Trap : एसीबीची कारवाई “झोपू”अधिकाऱ्याच्या घरी घबाड

Pune ACB Trap News : तत्कालिन उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल, ज्ञात उत्पन्नपेक्षा जास्त प्रमाणात संपत्तीचा आरोप

पुणे :- झोपडपट्टी पुनर्वसन कार्यालयातील तात्कालीन उप कार्यकारी अधिकारी श्रीश जाधव (Shirish Ramchandra Jadhav) यांच्यासह पतनी विरुद्ध लाचलुजपत प्रतिबंधक विभाग एसीबीने गुन्हा दाखल केला आहे. मूळसंपत्तीपेक्षा बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी एसीबीने दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. यादव यांच्या ज्ञात उत्पन्नापेक्षा एक कोटी 38 लाख 74 हजार रुपयांची 82b मालमत्ता जमा केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. Pune Latest Crime News

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. शितल जानवे खराडे यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात Bundgardan Police Station फिर्यादी दिली आहे. पोलिसांनी आरोपींच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, सन 1988 चे कलम 13 (क) (ड), 13 (1) (ई) सह 13(2) सह भा.दं.वि. क. 109 तसेच बेकायदेशीर उत्पन्नाचा फायदा घेण्याकरीता बनावट बाँड दस्त चौकशी अधिका-यास सादर करुन शासनाची फसवणुक केल्याने भा.दं. वि. कलम 420,467,468,469,474,477,120 (ब). अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शिरीष यादव झोपडपट्टी पुनर्वसन कार्यालयात उपमुख्य अधिकारी होते. त्यांच्याविरुद्ध यापूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली होती. त्यानंतर यादव यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी सुरु करण्यात आली. Pune Latest Crime News

सेवा कालावधीत मिळवलेल्या उत्पन्नापेक्षा जास्त उत्पन्न त्यांनी मिळवले होते. बेहिशेबी मालमत्ता जमाविल्याप्रकरणी त्यांची चौकशी सुरु झाली. उत्पन्नाबाबत यादव दाम्पत्य समाधानकारक खुलासा करुन शकले नाही. ज्ञात उत्पन्नापेक्षा यादव यांनी 1 कोटी 38 लाख 74 हजार रुपयांची बेहिशेबी मालमत्ता जमाविल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अतिरिक्त अधीक्षक डॉ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. उपअधीक्षक अनिल कटके याप्रकरणाचा तपास करत आहेत. (Pune ACB News)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0