अपहत बालकांच कौशल्यपूर्ण शोध घेणाऱ्या बंड गार्डन तपास पथकाला पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडून लाख रुपयांचे बक्षिस
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या प्रोत्साहनामुळे पुणे पोलिसामध्ये नवचैतन्य !
पुणे :- 6 महिने वयाच्या बालकाचे अपहरण करून विक्री करणारे टोळीला विजापुर राज्य कर्नाटक येथुन जेरंबद व अपहरण झालेल्या बालकाची सुटका करण्यास पोलिसांना यश आले पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी प्रोत्साहन देण्यासाठी बक्षीस जाहीर केले आहे. दिनांक 27 एप्रिल 2024 रोजी पुणे रेल्वे स्टेशन, समोरिल मोकळ्या जागेत आई सोबत झोपलेल्या 6 महिने वयाचे बालकाला पाहटे 02.00 वाजताचे सुमारास अनोळखी इसमाने उचलुन अपहरण करून चोरी केल्याचे मुलाचे नातेवाईक वडील यांनी 04.00 वाजताचे सुमारास फिर्यादी (34 वर्षे) (रा. यवतमाळ) यांनी समक्ष पोलीस ठाणेस येवून कळविल्याने बंडगार्डन पोलीस ठाणे भादंवि कलम 363,370,34 प्रमाणे गुन्हा नोदं करणेत आला. Pune Crime News
गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवून त्वरील 3 टीम तयार करून परिसरातील 50 पेक्षा जास्त सीसीटीव्ही फुटेज बारकाईने तपासले असता एका ठिकाणी संशयीत इसम मुलास उचलुन घेवून जाताना अस्पष्टपणे दिसुन आले. त्यानंतर पुन्हा बारकाईने पाहिले असता सदरचा संशयीत इसम हा पुणे स्टेशन परिसरातुन कोणत्या मार्गाने गेला हे दिसुन आले नाही त्यामुळे सदर गुन्हयामध्ये चारचाकी व्यहनाचा वापर झाला असावा तसेच गुन्हयात आरोपी 1 पेक्षा जास्त असल्याचा संशय बळविल्याने सदरबाबत तांत्रिक विश्लेषण करून गुन्हयातील आरोपी हे चारचाकी गाडीने पुणे स्टेशन येथुन विजापुर राज्य कर्नाटक येथे गेल्याचे निष्पन्न झाले. Pune Crime News
त्यानंतर गुन्हयाचे अनुषंगाने बंडगार्डन पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोउपनि रविंद्र गावडे व टीम वीजापुर राज्य कर्नाटक येथे तत्काळ रवाना करून सदर ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी छापा टाकुन इसम नामे चंद्रशेखर मलकाप्पा नडुगंड्डी (24 वर्षे) (रा. जंबगी ता. जि. वीजापुर) यास त्याचे राहते घरातुन ताब्यात घेतले त्याचेकडे कौशल्या पुर्ण तपास केला असता त्याने सदरचे बालक हे त्याचे इतर 4 साथीदार यांचे मदतीने अपहरण करून त्यांचेडील इंडिका कार मधुन वीजापुर येथे नेवून इसम नामे सुभाष सताप्पा कांबळे (55 वर्षे) (रा. लांवगी सोलापुर) यांना 3 लाख रुपयांना विक्री केल्याचे सांगितल्याने सदरील पोलीस पथकाने विजापुर शहर येथे वेगवेगळया हॉटेलमध्ये पाहणी केली असता हॉटेल राजधानी, गांधी चौक वीजापुर येथे अपहरण झालेले बालक व आरोपी सुभाष कांबळे यांना ताब्यात घेतले आहे. उत्कृष्ट कामगिरीबाबत पोलीस आयुक्त पुणे शहर अमितेश कुमार यांनी रोख एक लाख रुपये बक्षिस देवुन टिमचा गौरव केला आहे. Pune Crime News
पोलीस पथक
अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग पुणे, प्रविणकुमार पाटील, पोलीस उप आयुक्त परिमंडळ-2. पुणे शहर स्मार्तना पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त लष्कर विभाग, संजय सुर्वे वरीष्ठ पोलीस निरीक्षक संदीपान पवार, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीकांत निबांळकर यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक ‘सदिप मधाले, पोलीस उप-निरीक्षक रविंद्र गावडे, पोलीस उपनिरीक्षक चेतन धनवडे, पोलीस अंमलदार सुधीर घोटकुले, ज्ञानेश्वर बडे, सागर घोरपडे, मंगेश बोराडे, शिवाजी सरक, मनोज भोकरे, ज्ञानेश्वर गायकवाड, राजु धुलगुडे, विलास केकान यांचे पथकाने केली. Pune Crime News
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…