शिवाजीनगर पोलिसांनी केली अटक
Pune Crime Latest News : सराईत गुन्हेगार असलेला तसेच पुण्यातील पाच पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असलेला सराईत आरोपीला अटककरुन जेरबंद केले आहे
पुणे :- तम्मा कुसाळकर टोळीच्या सदस्याला शिवाजीनगर पोलिसांनी Pune Shivaji Nagar Police Station अटक केली आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात 2023 मध्ये दाखल असलेल्या एका गुन्ह्यातील फरार आरोपीला पोलिसांनी 18 महिन्यानंतर जेरबंद करण्यात आले आहे. त्याच्यावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात 307,120 ब,351,504 आर्म ॲक्ट कलम 4(25), महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37 (1),135 दाखल गुन्ह्यातील फरार आरोपी धनंजय गावडे याला 18 महिन्यानंतर पोलिसांनी अटक केली आहे. Pune Latest Crime News
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करत असताना मनपा बस स्टॉप भागात पोलीस उपनिरीक्षक अजित बडे, पो.ना. सचिन जाधव, वलटे, पोलीस हवालदार चव्हाण, मोहिते, यांच्या पथकाला आरोपी धनंजय गावडे राहत्या घराजवळ येणार असल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी सापळा रचून आरोपी धनंजय गावडे (38 वर्ष, रा.वाडी, शिवाजीनगर पुणे) याला अटक केली आहे.आरोपी हा तम्मा कुसाळकर टोळीचा सदस्य असून, त्याच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दोन गंभीर गुन्हे दाखल आहेत. डेक्कन पोलीस ठाण्यात बेकायदेशीर रित्या हत्यार बाळगल्या प्रकरणी आणि खंडणी सारखे गुन्हे दाखल आहे. विमानतळ पोलिस ठाण्यातही आरोपीच्या विरोधात गंभीर गुन्हे नोंद असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. Pune Latest Crime News
पोलीस पथक
पोलीस आयुक्त अमितेश कुमार, Pune CP Amitesh Kumar सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील, पोलीस उप आयुक्त संदिप गिल, सहाय्यक पोलीस आयुक्त साईनाथ ठोंबरे यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत, पोलीस उपनिरीक्षक, अजित बडे, पोलीस हवालदार दिपक चव्हाण,प्रमोद मोहिते, पोलीस नाईक सचिन जाधव, महावीर वलटे यांनी केली आहे. Pune Latest Crime News
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…