Pune Crime News : मॉर्निंग वॉक करणाऱ्या महिलेचे मंगळसूत्र सराईत चोरट्याने लांबवले
•मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलेल्या महिलेचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावल्याची घटना कर्वेनगर पुणे भागात घडली, आरोपीला पोलिसांनी केले जेरबंद
पुणे :- दुचाकीवरून आलेल्या 20 ते 25 वयोगटातील तरुणाने मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलेल्या महिलेचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावल्याची घटना 26 ऑगस्ट च्या पहाटे बाबुराव पडवळ रोड (डीपी रोड) कर्वेनगर पुणे येथे घटना घडली होती.या प्रकरणी अलंकार पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी अज्ञात आरोपीच्या विरोधात भादवि कलम 309(4) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अलंकार पोलीस ठाण्यात मंगळसूत्र हिसकावुन पळविल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. या घटनेच्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनीता रोकडे यांनी तात्काळ गुन्हा नोंदवला असून तपास पथक घडलेल्या घटनास्थळी सीसीटीव्ही फुटेज च्या पाहणी करून संशयित आरोपीला शोधण्यास सुरुवात केली. पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे डीपी रोड येथे सोनसाखळी चोरीच्या अनुषंगाने तपास अधिकारी व कर्मचारी गस्त घालत असताना सोनसाखळी चोरीच्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये साम्य असलेल्या 21 ते 25 वयोगटातील काळा टी-शर्ट आणि निळ्या रंगाची पॅन्ट व मोटरसायकल वर बसलेला आढळून आला त्याच्याजवळ जात असतो पळून जाऊ लागल्याने त्याच पोलिसांनी मोठ्या शिताफीने आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने आपण चैनस्नॅचिंग केल्याचे कबूल केले. तसेच वारजे पोलीस ठाण्याच्या हद्दीतही चैनस्नॅचिंग केल्याची कबुली जबाब आरोपीने दिला आहे. आरोपीचे नाव अक्षय गणपती तोडकर (23 वर्ष रा. दत्तवाडी पुणे) असे असून तो मूळचा कोल्हापूरचा आहे. पोलिसांनी आरोपीकडून चोरलेले सोन्याचे मंगळसूत्र, सोन्याची चैन, मोबाईल फोन, दुचाकी असे एकूण एक लाख 95 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलीस पथक
पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहाय्यक पोलीस आयुक्त अजय परमार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिता रोकडे, यांच्या मार्दगर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक अभिजीत काळे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक महेश निंबाळकर, पोलीस अंमलदार पवार, यादव, सपकाळ, कुंभार, राठोड, शिंदे, शिवडकर यांनी केली आहे.