Pune Latest Crime News : फरार आरोपीवर मुंबईच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यात, 316 सारखे गंभीर गुन्हे दाखल
पुणे :- पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट-6 Pune Police Unit 6 पोलिसांनी दमदार कारवाई करत मुंबईतील एमआयडीसी पोलीस ठाण्यातील गंभीर गुन्हा नोंद असलेल्या फरार आरोपीला नाना पेठ येथील एका लॉज मधून अटक केली आहे. पोलिसांनी आरोपी कडून चार लाख 50 हजार रुपये रोख रक्कम जप्त केली आहे. Pune Police Latest Crime News
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,23 ऑक्टोबर रोजी गुन्हे शाखा युनिट 6 पोलिसांचे अधिकारी व अंमलदार गुन्हे प्रतिबंधक गस्त तसेच पाहिजे व फरारी आरोपींचा शोध घेत होते. एमआयडीसी पोलीस स्टेशन, मुंबई कलम 316 (4), 318 (4) भादवि मधील पाहिजे आरोपी राज रविंद्र वाल्हे, (27 वय , व्यवसाय ऑफीस बॉय, रा. एकता चाळ, जेबीनगर मेट्रोस्टेशनजवळ, चकाला, अंधेरी पूर्व,) मुंबई हा समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत लक्ष्मी रोड, पुणे येथील परिसरात असल्याची गोपनीय माहिती प्रभारी पोलीस निरीक्षक वाहिद पठाण यांना मिळाली. आरोपीचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखा युनिट 6 कडील सहाय्यक पोलीस निरीक्षक मदन कांबळे व पथक यांना मिळालेल्या माहितीचे ठिकाणी रवाना केले असता त्यांनी पाहिजे आरोपीचा शोध घेवुन त्यास पराग लॉज, चाचा हलवाई चौक, नाना चवडी, नाना पेठ, पुणे येथुन ताब्यात घेतले. एमआयडीसी पोलीस ठाणे येथे संपर्क करून आरोपीस पोलीस उप निरीक्षक काशिद, एमआयडीसी पोलीस ठाणे यांचे ताब्यात दिले आहे. आरोपीकडुन गुन्हयातील 4.50 लाख रू. रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. Pune Police Latest Crime News
पोलीस पथक
अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) शैलेश बलकवडे, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) निखिल पिंगळे, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) राजेंद्र मुळीक यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, युनिट-6 चे प्रभारी पोलीस निरीक्षक वाहिद पठाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक मदन कांबळे, पोलीस उप-निरीक्षक रामकृष्ण दळवी, पोलीस हवालदार बाळासाहेब सकटे, रमेश मेमाणे, पोलीस नाईक नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, पोलीस अंमलदार ऋषीकेश ताकवणे, सचिन पवार, ऋषीकेश व्यवहारे, समीर पिलाने, गणेश डोंगरे, शेखर काटे, नितीन धाडगे, बाळासाहेब तनपुरे, सुहास तांबेकर, प्रतिक्षा पानसरे, किर्ती मांदळे तसचे गुन्हे शाखा युनिट-1 कडील पोलीस हवालदार विठ्ठल साळुंके, महिला पोलीस नाईक मयुरी जाधव, पोलीस अंमलदार निलेश जाधव, निलेश साबळे यांनी केली आहे. Pune Police Latest Crime News
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…