क्राईम न्यूज

Pune Crime News : पुणे ग्रामीणमध्ये बेकायदेशीर शस्त्रांचा साठा जप्त!

Pune Chakan Latest News : चाकण आणि म्हाळुंगे एमआयडीसीतून दोन पिस्तूल हस्तगत, एका अल्पवयीन मुलासह दोघे जेरबंद; 91 हजार रुपयांची शस्त्रे पोलिसांच्या ताब्यात!

पुणे (चाकण/म्हाळुंगे) :- पुणे ग्रामीण पोलीस Pune Gramin Police दलाच्या गुन्हे शाखेने चाकण आणि म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन वेगवेगळ्या कारवाया करत, बेकायदेशीर पिस्तूल बाळगणाऱ्यांना दणका दिला आहे. एका अल्पवयीन मुलासह एका तरुणाला या प्रकरणात ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून एकूण 91 हजार रुपये किमतीची दोन पिस्तुले आणि जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. Pune Police Latest Crime News

चाकण मार्केट यार्डजवळ पहिली कारवाई

गुन्हे शाखा युनिट तीनने चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत पहिली कारवाई करत एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. शनिवारी सायंकाळी पावणे आठ वाजताच्या सुमारास चाकण मार्केट यार्डजवळ ही कारवाई करण्यात आली. या अल्पवयीन मुलाकडून 41 हजार रुपये किमतीची पिस्तूल आणि जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई श्रीधन इचके यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

कुरकुंडी सेलू रोडवर दुसऱ्या आरोपीला अटक

दुसरी कारवाई म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे शाखा युनिट चारने केली. रविवारी दुपारी सव्वातीन वाजताच्या सुमारास कुरकुंडी सेलू गाव रोडवर ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत एका 33 वर्षीय तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याच्याकडून 50 हजार रुपये किमतीची पिस्तूल आणि एक हजार रुपये किमतीचे एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई शेखर खराडे यांनी म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पुणे ग्रामीण पोलीस बेकायदेशीर शस्त्रे बाळगणाऱ्यांविरोधात सक्त कारवाई करत असून, ताब्यात घेतलेल्या या दोघांनी ही शस्त्रे कुठून आणली आणि त्यांचा उद्देश काय होता, याचा सखोल तपास पोलीस करत आहेत. या कारवाईमुळे पुणे ग्रामीण परिसरात गैरप्रकार करणाऱ्या गुन्हेगारांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे.

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

6 hours ago