Pune Crime News | ५० लाखांची खंडणी मागणारा फरार आरोपी गजाआड : गुन्हे शाखा, युनिट-३ कडून अटक
पुणे, दि. ७ ऑक्टोबर, महाराष्ट्र मिरर :
मुबारक जिनेरी
Pune Crime News | भारती विद्यापीठ हद्दीत गाडी अडवून चाकूचा धाक दाखवून ५० लाखांची खंडणी मागणारा आरोपी तब्बल १ वर्षानंतर जेरबंद झाला आहे. गुन्हे शाखेच्या युनिट-३ कडून एका कारवाईत धायरी फाटा परिसरातून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. Pune Crime News
फरार आरोपी तेजस मधुकर कांबळे, वय २३ वर्षे, रा. पवन मेडीकल शेजारी, बेनकरी वस्ती, धायरी, पुणे याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी कि, फिर्यादी अभिजीत कृष्णा भोझे, रा. श्रीराम गार्डन, भारती विदयापीठ, पुणे यांना दि. ०६ मे २०२३ रोजी खंडणी उकळण्याचे उददेशाने त्यांची गाडी अडवून चाकुचा धाक दाखवून शिवीगाळ व मारहाण करून ५०,००,०००/- रूपये खंडणी मागतलेबाबत भारती विदयापीठ पोलीस ठाणे गुन्हा रजि. नंबर २९७/२०२३ भादंविक ३८७, ५०६ (२), ३२३, १४३, १४४, १४७, १४८, १४९, ५०४, ५०६ प्रमाणे दि. १४/०५/२०२३ रोजी गुन्हा नोंद होता.
आरोपी तेजस मधुकर कांबळे हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होता. सदर आरोपीबाबत गुन्हे शाखा, युनिट ३. पुणे कडील पोलीस शिपाई ज्ञानेश्वर चित्ते यांना मिळाले बातमी वरून नमुद आरोपीस धायरी फाटा, पुणे येथून पकडून त्यास पुढिल कारवाईकामी भारती विदयापीठ पोलीस ठाणेकडे देण्यात आले.
सदरची कामगिरी ही, पोलीस आयुक्त, अमितेश कुमार, पुणे शहर पोलीस सह-आयुक्त, रंजनकुमार शर्मा, पुणे शहर अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, शैलेश बलकवडे, पुणे शहर मा. पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, निखील पिंगळे पुणे शहर सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे-१, गणेश इंगळे, पुणे शहर, यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट ३ चे प्रभारी अधिकारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रंगराव पवार, पोलीस अंमलदार विनोद भंडलकर, गणेश सुतार, विनोद जाधव, सोनम नेवसे, ज्ञानेश्वर चित्ते, गणेश शिंदे यांचे पथकाने केली आहे.
Maharashtra Mirror (@maharashtramirrornews) • Instagram photos and videos