पुणे, दि. १६ एप्रिल, मुबारक जिनेरी, महाराष्ट्र मिरर : Pune Crime News
माणूस कितीही उच्चशिक्षित असला तरी त्याला धर्माची भीती असतेच. स्वर्ग ‘जन्नत’ मिळवून देण्याचे आमिष दाखवून परदेशातून परतलेल्या डॉक्टरला कोंढव्यात कोट्यवधींचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी डॉक्टर यांच्या फिर्यादीवरून ५ जणांविरुद्ध (Kondhwa Police Station) कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. Pune Crime News
डॉक्टर अहमदअली इनामअली कुरेशी, वय – ६७, रा. मायफेयर एलेगंजा, कोंढवा, पुणे यांची सुमारे ५ कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.
डॉक्टर यांनी दिलेल्या तक्रारीवरून कोंढवा पोलीस ठाण्यात आरोपी सादिक अब्दुलमजीद शेख, त्यांची पत्नी यास्मिन आणि त्यांची मुले, एतेशाम आणि अम्मार रा. हार्मोनी सोसायटी, गुलटेकडी, पुणे तसेच राज आढाव उर्फ नरसु यांच्या विरुद्ध गुरन ३९६/२०२४ भादंवि कलम ४२०, ४०६, ३२३, ४०६, ३४ अनव्ये गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, डॉक्टर अहमदअली कुरेशी हे काही वर्षांपूर्वी परदेशातून परतले होते. यावेळी नमाज पठणासाठी मस्जिदमध्ये जात असताना त्यांची आरोपी सादिक शेख यांच्यासोबत ओळख झाली. ओळखीतून आरोपी यांनी डॉक्टर यांचा विश्वास संपादन करून त्यांच्याशी जवळीक वाढवली. डॉक्टर यांच्याकडे वारेमाप पैसे असल्याचे आरोपी यांनी हेरून त्यांच्याकडे असलेल्या ११ मालमत्तावर नजर ठेवली. डॉक्टर कुरेशी यांच्या कौटुंबिक अडचणींचा फायदा घेत आरोपींनी त्यांच्याकडे असलेल्या मालमत्ता, पैशाचा फायदा उचलण्यासाठी ‘जन्नत’ चे आमिष दाखवून ७ स्थावर मिळकती, ३ कोटी २० लाख झेरोधा खात्यावर, १ कोटी ५७ लाख रक्कम बँक ट्रान्सफर व सुमारे ६० लाख रुपयांचे सोन्याचे बिस्कीट असा मुद्देमाल लाटला. काही दिवसांनी डॉक्टर कुरेशी यांना आरोपी कौटुंबिक अडचणींचा फायदा घेत आपल्याला स्वर्ग मिळवून देण्याच्या नावाखाली धोका देत असल्याचे लक्षात आले.
यावेळी महाराष्ट्र मिरर प्रतिनिधींशी बोलताना, कोंढवा पोलीस ठाण्याचे गुन्हे निरीक्षक मानसिंग पाटील Police Inspector Mansing Patil यांनी सांगितले कि, कौटुंबिक अडचणीतुन मार्ग काढण्यासाठी आरोपींनी डॉक्टर यांना स्वर्गाचे ‘जन्नत’ मिळण्यासाठी आमिष दाखविले. आरोपींनी डॉक्टरकडून ७ मिळकती व सुमारे ५ कोटी रुपये घेऊन त्यांची फसवणूक केली आहे. यातील काही मिळकती डॉक्टर यांना परत करण्यात आल्या आहेत. सदर प्रकाराचा कोंढवा पोलीस सखोल तपास करत आहेत.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…