क्राईम न्यूजपुणे

Pune Crime News | ‘जन्नत’ चे आमिष दाखवून डॉक्टरला ५ कोटींचा गंडा : कोंढव्यातील प्रकाराने खळबळ

Pune Crime News | परदेशातून परतलेल्या डॉक्टरला दाखविली 'जन्नत'

  • Pune Crime News | परदेशातून परतलेल्या डॉक्टरला दाखविली ‘जन्नत’

पुणे, दि. १६ एप्रिल, मुबारक जिनेरी, महाराष्ट्र मिरर : Pune Crime News

माणूस कितीही उच्चशिक्षित असला तरी त्याला धर्माची भीती असतेच. स्वर्ग ‘जन्नत’ मिळवून देण्याचे आमिष दाखवून परदेशातून परतलेल्या डॉक्टरला कोंढव्यात कोट्यवधींचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी डॉक्टर यांच्या फिर्यादीवरून ५ जणांविरुद्ध (Kondhwa Police Station) कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. Pune Crime News

डॉक्टर अहमदअली इनामअली कुरेशी, वय – ६७, रा. मायफेयर एलेगंजा, कोंढवा, पुणे यांची सुमारे ५ कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.

डॉक्टर यांनी दिलेल्या तक्रारीवरून कोंढवा पोलीस ठाण्यात आरोपी सादिक अब्दुलमजीद शेख, त्यांची पत्नी यास्मिन आणि त्यांची मुले, एतेशाम आणि अम्मार रा. हार्मोनी सोसायटी, गुलटेकडी, पुणे तसेच राज आढाव उर्फ नरसु यांच्या विरुद्ध गुरन ३९६/२०२४ भादंवि कलम ४२०, ४०६, ३२३, ४०६, ३४ अनव्ये गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, डॉक्टर अहमदअली कुरेशी हे काही वर्षांपूर्वी परदेशातून परतले होते. यावेळी नमाज पठणासाठी मस्जिदमध्ये जात असताना त्यांची आरोपी सादिक शेख यांच्यासोबत ओळख झाली. ओळखीतून आरोपी यांनी डॉक्टर यांचा विश्वास संपादन करून त्यांच्याशी जवळीक वाढवली. डॉक्टर यांच्याकडे वारेमाप पैसे असल्याचे आरोपी यांनी हेरून त्यांच्याकडे असलेल्या ११ मालमत्तावर नजर ठेवली. डॉक्टर कुरेशी यांच्या कौटुंबिक अडचणींचा फायदा घेत आरोपींनी त्यांच्याकडे असलेल्या मालमत्ता, पैशाचा फायदा उचलण्यासाठी ‘जन्नत’ चे आमिष दाखवून ७ स्थावर मिळकती, ३ कोटी २० लाख झेरोधा खात्यावर, १ कोटी ५७ लाख रक्कम बँक ट्रान्सफर व सुमारे ६० लाख रुपयांचे सोन्याचे बिस्कीट असा मुद्देमाल लाटला. काही दिवसांनी डॉक्टर कुरेशी यांना आरोपी कौटुंबिक अडचणींचा फायदा घेत आपल्याला स्वर्ग मिळवून देण्याच्या नावाखाली धोका देत असल्याचे लक्षात आले.

यावेळी महाराष्ट्र मिरर प्रतिनिधींशी बोलताना, कोंढवा पोलीस ठाण्याचे गुन्हे निरीक्षक मानसिंग पाटील Police Inspector Mansing Patil यांनी सांगितले कि, कौटुंबिक अडचणीतुन मार्ग काढण्यासाठी आरोपींनी डॉक्टर यांना स्वर्गाचे ‘जन्नत’ मिळण्यासाठी आमिष दाखविले. आरोपींनी डॉक्टरकडून ७ मिळकती व सुमारे ५ कोटी रुपये घेऊन त्यांची फसवणूक केली आहे. यातील काही मिळकती डॉक्टर यांना परत करण्यात आल्या आहेत. सदर प्रकाराचा कोंढवा पोलीस सखोल तपास करत आहेत.

Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकरांनी जाहीरनामा प्रसिद्ध केला, सीएए आणि एनआरसी या मोठ्या घोषणा

Mumbai Crime News : सलमान खान यांच्या घरावर झालेल्या गोळीबारानंतर मुंबई पोलिसांनी दोन आरोपींना केले अटक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0