क्राईम न्यूज

Pune Crime News : पैसे देण्यास नकार दिल्याने 17 वर्षीय मुलाला मारहाण, लाखो रुपयांचा ऐवज लंपास

Pune Pimpari Chinchwad Latest Crime News : पिंपरीत पूर्ववैमनस्यातून तरुणाला दगडाने मारहाण

पिंपरी-चिंचवड :- पिंपरी-चिंचवडमधील निगडी परिसरात पैसे देण्यास नकार दिल्याने एका 17 वर्षीय मुलाला मारहाण करून त्याला लुटल्याचा प्रकार समोर आला आहे. बुधवारी (10 सप्टेंबर) दुपारी अंकुश चौक, ओटा स्कीम येथे ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी सोहेल संतोष जाधव (वय 20) याला अटक केली असून, त्याच्या तीन साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Pune Crime News

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी मुलाला लोखंडी फायटर आणि कोयत्याच्या उलट्या बाजूने मारहाण केली. तसेच, लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्याचा मोबाईल, दुचाकी आणि त्याच्या मित्राचा मोबाईल असा एकूण 1 लाख 14 हजार रुपयांचा मुद्देमाल जबरदस्तीने चोरून नेला. शस्त्रे दाखवून आरोपींनी परिसरात दहशतही निर्माण केली होती. निगडी पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

जुन्या भांडणांच्या कारणावरून एका तरुणाला दगडाने मारहाण केल्याची घटना पिंपरी गावात घडली आहे. या प्रकरणी एका तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने जुन्या भांडणाच्या रागातून फिर्यादीला शिवीगाळ करत हाताने मारहाण केली. त्यानंतर कपाळावर दगडाने मारून त्याला जखमी केले. तसेच, त्याच्या घराच्या खिडक्यांवर दगड मारून काचा फोडल्याने मोठे नुकसान झाले. पिंपरी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

vivek

Recent Posts