Pune Crime News | चोरट्याकडून ११ दुचाकी व रिक्षा जप्त : चतुःश्रृंगी पोलीसांकडून कारवाई
- वपोनि अजय कुलकर्णी यांच्याकडून कारवायांचा सपाटा
पुणे, दि. ५ एप्रिल, महाराष्ट्र मिरर : Pune Crime News
वारंवार घडणाऱ्या चोरीच्या घटना रोखण्यासाठी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरात व्यापक मोहीम राबविली आहे. चतुःश्रृंगी पोलीसांकडून एकापाठोपाठ कारवायांमध्ये तीन चोरट्यांकडून ११ दुचाकी व रिक्षा जप्त करण्यात आली आहे. या कारवाईत तब्बल ६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. Pune Crime News
या कारवाईत आरोपी १. कन्हैया दत्तात्रय पवार, वय १९ वर्षे, रा. कळमकर चौक, अंजुर सोसायटी जवळ, बाणेर रोड, पुणे २) किशन राजेश राम, वय २० वर्षे, रा. विठ्ठल निवास, वाकड, पुणे व ३) चंद्रकांत रामा पटेकर, वय २४ वर्षे, रा. थेरगाव, पुणे यांना अटक करण्यात आली आहे.
चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन कडील तपास पथक हे गु. र. क्र. २८०/२०२४ भादवि कलम ३७९ या वाहनचोरीच्या गुन्हयाचा तपास करत असताना सीसीटिव्ही फुटेजमध्ये दिसुन आलेल्या आरोपीचा शोध घेत होते, त्यावेळी पो. अं. १४०१/श्रींकांत साबळे यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली कि सीसीटिव्ही फुटेजमध्ये दिसणारा व वाहनचोरी करणारा कन्हैया पवार नावाचा इसम असून तो गणराज चौक, बाणेर, पुणे येथे राहण्यास आहे. नमूद माहितीच्या आधारे तपास पथकाकडील आधिकारी व अंमलदार यांनी गणराज चौक, बाणेर, पुणे याठिकाणी सापळा रचुन कन्हैया दत्तात्रय पवार, वय १९ वर्षे, रा. कळमकर चौक, अंजुर सोसायटी जवळ, बाणेर रोड, पुणे यास ताब्यात घेवून त्याच्याकडे तपास केला असता त्याने नमूद गुन्हयामधील दुचाकी चोरी केल्याचे कबुल केल्याने त्यास अटक करण्यात आली होती. पोलीस कस्टडी रिमांड प्राप्त करून त्याच्याकडे कसुन तपास केला असता त्याच्याकडून एकूण ४,८०,०००/- रु किंमतीच्या ११ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. नमूद आरोपीकडून चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन कडील ०७ व हिंजवडी पोलीस स्टेशन कडील ०२ असे एकूण ०९ वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आलेले आहेत. नमुद आरोपीने चोरलेल्या दुचाकी विकून मिळणाऱ्या पैशामधून चैनी करता यावी, या उद्देशाने दुचाकी चोरल्याचे सांगितले आहे, परंतु आरोपीने दुचाकी विकण्याअगोदरच त्यास जेरबंद करण्यात चतुःश्रृंगी पोलीसांना यश आले आहे.
तसेच आरोपी नामे १) किशन राजेश राम, वय २० वर्षे, रा. विठ्ठल निवास, वाकड, पुणे व २) चंद्रकांत रामा पटेकर, वय २४ वर्षे, रा. थेरगाव, पुणे यांना अटक करून त्यांच्याकडून गु. र. क्र. २९८/२०२४ भादवि कलम ३७९ मधील चोरीस गेलेली १,५०,०००/- रु किं. ची अॅटो रिक्षा जप्त करून सदरचा गुन्हा उघडकीस आणलेला आहे.
सदरची कामगिरी Pune Police पोलीस आयुक्त अमितेशकुमार, सह पोलीस आयुक्त प्रवीण पवार, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उप आयुक्त परी-४, पुणे शहर विजय मगर, सहायक पोलीस आयुक्त, आरती बनसोडे यांचे मार्गदशनाखाली चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन पुणे शहर चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय कुलकर्णी, पोलीस निरीक्षक गुन्हे, युवराज नांद्रे, सहा. पोलीस निरीक्षक, नरेंद्र पाटील, पोलीस उप निरीक्षक, रुपेश चाळके, प्रणिल चौगुले, तपास पथकातील पोलीस अंमलदार श्रीकांत साबळे, श्रीकांत वाघवले, बाळासाहेब भांगले, बाबुलाल तांदळे, किशोर दुशिंग, प्रदीप खरात, मारुती केंद्रे, संदिप दुर्गे, सुधीर माने, इरफान मोमीन, बाबा दांगडे, श्रीधर शिर्के व विशाल शिर्के यांनी केली आहे.