Pune Fire Accident : पुण्यात इमारतीला भीषण आग, महिलेचा मृत्यू

Pune Building Fire Accidnet News : पुण्यातील कोंढवा येथील एनआयबीएम रोडवर असलेल्या एका इमारतीला आग लागल्यानंतर अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. या अपघातात एका महिलेला आपला जीव गमवावा लागला, तर दोन जण जखमी झाले.
पुणे :- पुण्यातील कोंढवा येथील एका निवासी इमारतीला आग लागल्याची घटना समोर आली आहे. Pune Building Fire Accident या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला आहे, तर दोन जण जखमी झाले आहेत. ही आगीची घटना एनआयबीएम रोडवरील इमारतीत घडली. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.
रविवारी सायंकाळी पाच ते सहा वाजेच्या दरम्यान ही आग लागली होती.अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू केले. पुणे अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार आग आटोक्यात आणण्यात आली आहे. दरम्यान, या अपघातात जखमी झालेल्यांना उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.