पुणे

Pune Bribe News : 10 हजार रुपयांची लाच घेणाऱ्या दोन पोलिसांना शिक्षा

•पुणे आणि साताऱ्यातील दोन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये न्यायालयाचा निकाल; पोलीस हवालदार आणि उपनिरीक्षकास तुरुंगवास

पुणे :- लाच घेण्याप्रकरणी पुणे आणि सातारा येथे कार्यरत असलेल्या दोन पोलिसांना न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) पुणे परिक्षेत्रातील या दोन वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये पोलीस हवालदार आणि पोलीस उपनिरीक्षक अशा दोघांनाही तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

मुंढवा, पुणे येथील प्रकरण

पोलीस हवालदार रमेश ढमढेरे (वय 55) यांना लाच घेतल्याप्रकरणी शिक्षा झाली आहे. 2016 मध्ये एका जुगाराच्या गुन्ह्यात चार आरोपींना मदत केल्याबद्दल त्यांनी तक्रारदाराकडून 1000 रुपयांची लाच स्वीकारली होती. या प्रकरणी तत्कालिन पोलीस निरीक्षक राजू थानसिंग चव्हाण यांनी सखोल तपास करून दोषारोपपत्र दाखल केले होते.

या खटल्याची सुनावणी विशेष न्यायाधिश, अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश क्र.1, शिवाजीनगर, पुणे यांच्या न्यायालयात झाली. न्यायालयाने रमेश ढमढेरे यांना दोषी ठरवून, भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम, 1988 च्या कलम 7 अंतर्गत 3 वर्षांचा सश्रम कारावास आणि 10,000 रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. तसेच, दंड न भरल्यास 15 दिवसांचा अतिरिक्त कारावास भोगावा लागेल. या प्रकरणी शासनातर्फे सहायक सरकारी अभियोक्ता मारुती वाडेकर यांनी बाजू मांडली. एसीबी, पुणे यांच्या वतीने पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे आणि पोलीस हवालदार संतोष डोके यांनी न्यायालयीन कामकाजात सहकार्य केले.

कराड, सातारा येथील प्रकरण

कराड शहर पोलीस ठाण्यातील तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक भरत गोपाळ होळकर यांनाही लाच घेतल्याबद्दल शिक्षा झाली आहे. 2014 मध्ये एका तक्रार अर्जाचा अहवाल वरिष्ठांना सादर करण्यासाठी त्यांनी तक्रारदाराकडे 10,000 रुपयांची मागणी केली होती आणि त्यापैकी 7,000 रुपये स्वीकारताना ते एसीबीच्या जाळ्यात अडकले. तत्कालिन पोलीस निरीक्षक वैशाली पाटील यांनी या गुन्ह्याचा तपास केला होता.

या खटल्याची सुनावणी विशेष न्यायाधिश, अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश, कराड, जि. सातारा यांच्या न्यायालयात झाली. न्यायालयाने भरत होळकर यांना दोषी ठरवून, कलम 7 अंतर्गत 1 वर्षाचा सश्रम कारावास आणि 5,000 रुपये दंड तसेच कलम 13(1)(ड) सह 13(2) अंतर्गत 2 वर्षांचा सश्रम कारावास आणि 10,000 रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली. या प्रकरणात शासनाचे सहायक सरकारी अभियोक्ता श्री. एम. व्ही. कुलकर्णी यांनी कामकाज पाहिले. एसीबी, सातारा यांच्या वतीने पोलीस निरीक्षक सचिन राऊत आणि सहायक पोलीस फौजदार राजेश विरकर यांनी सहकार्य केले.

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

4 hours ago