पुणे
Trending

Pune Bribe News : प्राथमिक शिक्षण संचालनालय, पुणे येथील महिला मुख्य लिपिकाला लाच मागितल्या प्रकरणी एसीबीच्या जाळ्यात

•Female Chief Clerk of Directorate of Primary Education caught red handed for demanding bribe सुनिता रामकृष्ण माने, मुख्य लिपीक प्राथमिक शिक्षण संचालनालय यांना लाच मागितले आणि स्वीकारल्या प्रकरणे एसीबीने अटक केली असून त्यांच्या विरोधात बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे

पुणे :- पुणे प्राथमिक शिक्षण संचालनालय येथे कार्यरत असलेल्या मुख्य लिपिक सुनीता रामकृष्ण माने (46 वय) यांना लाच Pune Bribe News मागून स्वीकारल्या प्रकरणे एसीबीने अटक केली आहे. त्यांच्या विरोधात बंडगार्डन पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, सन 1988 चे कलम 7 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकं काय प्रकरण आहे?”

तक्रारदार यांच्या कायम विना अनुदानित प्रकारच्या दोन शाळा आहेत. त्यात इयत्ता पहिली ते बारावीचे शिक्षण दिले जाते. तक्रारदार यांच्या वरील दोन्ही शाळेत सन 2023-24 या शैक्षणिक वर्षात आर.टी.ई. (बालकांचा मोफत शिक्षणाचा हक्क) अंतर्गत प्रवेशित असलेल्या बालकांना 25% टक्के प्रवेश देण्यात आलेला आहे. या प्रवेशाकरीता या बालकांच्या शिक्षणापोटी त्यांची फी ही शासनाकडून शाळांना देण्यात येते. त्यानुसार सन 2023-24 कालावधीत तक्रारदारांच्या दोन्ही शाळेत आर.टी.ई. अंतर्गत 25% प्रवेश दिलेल्या बालकांची फी एकुण 12 लाख 69 हजार 141रुपये तक्रारदारास शासनाकडून येणे बाकी होते. उच्च न्यायालयाने शासनास आठ आठवडयाच्या आतमध्ये हि रक्कम संबंधीत संस्था चालकास (तक्रारदारास) अदा करणेबाबत ऑगस्ट 2024 मध्ये आदेश दिला होता. त्याप्रमाणे शासनाने सप्टेंबर 2024 मध्ये रक्कमही रिलीज केली होती. रक्कम तक्रारदार यांना अदा करण्याबाबतचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जि. नाशिक यांना आदेश काढण्याकरीता मुख्य लिपिक सुनिता माने यांनी तक्रारदार यांचेकडे त्यांना मिळणा-या 12 लाख 69 हजार 141 या रकमेच्या 1 % म्हणजे 12 हजार 600 रुपये लाचेची मागणी केल्याची तक्रार तक्रारदार यांनी ला.प्र.वि. पुणे येथे दिली होती.

तक्रारदार यांच्या तक्रारीची पडताळणी पंचासमक्ष केली असता, मुख्य लिपिक सुनिता माने यांनी तक्रारदार यांचेकडे वरील कामासाठी 12 हजार 600 रुपयांची लाच Pune Bribe News मागणी करुन, ती लाचेची रक्कम (बारा हजार सहाशे रुपये) तक्रारदाराकडून पंचासमक्ष प्राथमिक शिक्षण संचालनालय कार्यालय, सेंट्रल बिल्डींग, पुणे येथे स्विकारले असता मुख्य लिपीक सुनिता माने यांना ताब्यात घेण्यात आलेले असून, त्यांचेविरुद्ध बंडगार्डन नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे. ला.प्र.वि. पुणे येथील पोलीस उपअधीक्षक अनिल कटके तपास करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0