Pune Bribe News : शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार चव्हाट्यावर ; एक लाखाची लाच स्वीकारताना वरिष्ठ सहाय्यक आणि कार्यालयीन अधीक्षक अडकला
Pune Latest ACB Trap News : बी. जे. शासकीय महाविद्यालय, पुणे येथील वरिष्ठ सहायक आणि कार्यालयीन अधीक्षक यांना लाच मागणी व लाच स्वीकारले प्रकरणी ताब्यात
पुणे :- बी. जे. शासकीय महाविद्यालयतील BJ Colleges Pune Bribe News कर्मचाऱ्यांकडून धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.महाविद्यालयातील फर्निचर सप्लाय करणाऱ्या ठेकेदाराचे बिल पास करण्यासाठी एक लाखाची लाच स्वीकारताना वरिष्ठ सहायक व कार्यालयीन अधीक्षक यांना बी. जे. शासकीय महाविद्यालयाच्या कार्यालयाच्या परिसरात रंगेहात पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ही कारवाई केली. Pune Latest ACB Trap News
जयंत पर्वत चौधरी, (वय 49) वरिष्ठ सहायक आणि सुरेश विश्वनाथ बोनवळे, (वय 53) कार्यालयीन अधीक्षक असे लाचखोर कर्मचाऱ्यांचे नाव असून दोघेही बी. जे. शासकीय महाविद्यालय येथे नमूद पदावर कार्यरत आहे.एसीबीने दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार यांचा फर्निचर सप्लायरचा व्यवसाय आहे. तक्रारदार यांनी सन 2023 मध्ये 20 लाख रुपये किंमतीचे फर्निचर बी. जे. शासकीय महाविद्यालयास दिले होते. तक्रारदाराच्या फर्निचरचे एकूण बिलापैकी दहा लाख रुपयाचे बिल सादर व मंजुर करण्यासाठी लोकसेवक जयंत चौधरी व सुरेश बोनवळे यांनी तक्रारदाराकडे त्या रकमेच्या 13% प्रमाणे 1.30 लाख रुपयाच्या लाचेची मागणी होती . याबाबतची तक्रार तक्रारदार यांनी 1 एप्रिल रोजी ला.प्र.वि. पुणे येथे दिली होती.
प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने बुधवार ( 2 एप्रिल) रोजी बी. जे. शासकीय महाविद्यालय कार्यालय, पुणे येथे पंचासमक्ष पडताळणी केली असता, लोकसेवक जयंत चौधरी व सुरेश बोनवळे यांनी तक्रारदाराकडे पंचासमक्ष त्यांचे एकूण बिलाच्या रक्कमेपैकी दहा लाखाचे बिल मंजूर करण्यासाठी सुरवातीस बिलाच्या रकमेच्या 13% प्रमाणे 1.30 लाख रुपयांची लाच मागणी करुन, तडजोडीअंती 1 लाख रुपयांची लाच मागणी करुन, सुरेश बोनवळे यांनी ती लाच रक्कम लोकसेवक जयंत चौधरी यांचेकडे देण्याबाबत तक्रारदारास सांगितल्याचे निष्पन्न झाले. लोकसेवक जयंत चौधरी यांनी लोकसेवक सुरेश बोनवले यांचे सांगणेवरून तक्रारदाराकडून एक लाख रुपये लाच रक्कम बी. जे. शासकीय महाविद्यालय, पुणे येथील कार्यालयात पंचासमक्ष स्विकारली असता त्या दोघांना रंगेहाथ पकडण्यात आले असून, त्यांचेविरुद्ध बंडगार्डन पोलीस ठाणे येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, सन 1988 चे कल 7,7 अ अन्वये गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे.गुन्हयाचा तपास प्रसाद लोणारे, पोलीस निरीक्षक, लाप्रवि करीत आहे.



