पुणे

Pune Bribe News : महावितरणाच्या लाचखोर अधिकाऱ्याला एसीबीचा “झटका”, दोन लाखांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले

Mahavitaran Officer caught red-handed accepting bribe of two lakhsमहावितरण बंडगार्डन विभाग, पुणे येथे कार्यकारी अभियंता पदावर कार्यरत असलेल्या अधिकाऱ्याला दोन लाखांची लाच प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे यांनी कारवाई करत ताब्यात घेतले आहे

पुणे :- महावितरणाच्या अधिकाऱ्याला दोन लाखांची लाच प्रकरणी एसीबीने ताब्यात घेतले आहे. पुणे महावितरणाच्या बंड गार्डन विभाग येथे कार्यकारी अभियंता पदावर कार्यरत असलेल्या भाऊसाहेब मच्छिंद्र सावंत (51वय) यांना दोन लाखांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले आहे.

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे शासन मान्यताप्राप्त महावितरणाचे कॉन्ट्रॅक्टर आहेत. त्यांनी त्यांचे ओळखीचे व्यावसायिकांच्या 5 नविन इमारतीसाठी इलेक्ट्रिक डीपी उभारुन सप्लाय चालू करुन देण्याचे काम घेतले होते. त्यासाठी त्यांनी 5 फाईल तयार करुन मंजुरीसाठी भाऊसाहेब सावंत यांच्या (महावितरण कार्यालय, बंडगार्डन विभाग, पुणे) येथे दिलेल्या होत्या. तसेच, तक्रारदार यांनी मांजरी येथील एका नवीन इमारतीच्या ठिकाणी उभारलेल्या डीपी वर भाऊसाहेब सावंत यांचेकडून वीज भार मंजूर करुन घेवून सप्लाय चालु करुन दिला आहे. भाऊसाहेब सावंत यांच्याकडे तक्रारदार यांच्या वरील प्रमाणे प्रलंबित असलेल्या 5 फाईलवर कार्यवाही करण्यासाठी आणि तक्रारदाराने मांजरी येथील नविन इमारतीसाठी उभारलेल्या डीपीवर वीज भार मंजूर केल्याचा मोबदला म्हणून भाऊसाहेब सावंत यांनी तक्रारदार यांचेकडे पाच लाख रुपयांची लाचेची मागणी केल्याची तक्रार तक्रारदार यांनी ला.प्र.वि. पुणे येथे दिली होती.

एसीबीने तक्रारदार यांच्या प्राप्त तक्रारीची पंचासमक्ष पडताळणी केली असता, कार्यकारी अभियंता भाऊसाहेब सावंत यांनी तक्रारदाराच्या प्रलंबित असलेल्या 5 फाईलवर कार्यवाही करण्यासाठी व तक्रारदाराने मांजरी येथील नविन इमारतीसाठी उभारलेल्या डीपीवर वीज भार मंजूर केल्याचा मोबदला म्हणून पाच लाख रुपयाच्या लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न होवून, आज (23 ऑक्टोबर) रोजी तक्रारदाराकडे एकुण मागितलेल्या लाच रक्कमेपैकी ॲडव्हान्स म्हणून दोन लाख रुपये लाच रक्कम कार्यकारी अभियंता भाऊसाहेब सावंत यांनी तक्रारदाराकडून पंचासमक्ष स्वीकारले एसीबीने सापळा रचून कार्यकारी अभियंता सावंत यांना ताब्यात घेतले आहे.त्यांचेविरुद्ध वानवडी पोलीस स्टेशन, पुणे शहर येथे भ्रष्टाचारा प्रतिबंध अधिनियमन सन 1988 चे कलम 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास ला.प्र.वि. पुणे येथील पोलीस निरीक्षक विरनाथ माने तपास करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0