Pune Breaking News : अवैध गुटख्याची वाहतूक करणाऱ्या दोघांवर पोलिसांचा सर्जिकल स्ट्राईक, 8.58 लाखांचा गुटखा जप्त
•पुण्याच्या भारतीय विद्यापीठ आणि स्वारगेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करणाऱ्या दोन भावांसह दोन टेम्पो जप्त
पुणे :- गुटख्याची अवैध पद्धतीने वाहतूक करणाऱ्या दोघांना स्वारगेट पोलिसांनी तसेच भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली. शुक्रवारी रात्री ही कारवाई करण्यात आली. आरोपीकडून 8 लाख 58 हजार रुपयांचा गुटखा आणि दोन टेम्पो असा 18 लाख 58 हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. गुटख्याची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या दोन्ही भावांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याविरुद्ध भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपींच्या विरोधात भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 123,274,275,223 अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2023 चे कलम 2006 चे कलम 30(2),(अ),26(2) (1),26 (2),(4) अंतर्गत 59 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे.
सौरभ उर्फ धनराज रामकृष्ण निंबाळकर (24 वय रा.श्रीराम सोसायटी, आय विंग फलॅट नंबर -5, थोरवे शाळेसमोर, पुणे), संग्राम रामकृष्ण निंबाळकर, (वय 26) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वारगढ पोलीस ठाण्याचे पोलिस अंमलदार संजय भापकर यांना भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील फालेनगर या परिसरात अवैधरित्या गुटख्याची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली होती. याबाबतचे माहिती पोलीस उपायुक्त परिमंडळ -2 स्मार्तना पाटील यांना दिली होती. सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष कोळी आणि पोलीस अंमलदार पंकज माने, स्वारगेट पोलीस ठाण्याचे पोलिस अंमलदार राहुल तांबे, कुंदन शिंदे,सागर केकाण, भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे तपास पथकाचे अधिकारी निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार महेश बारवरकर,मितेश चोरमोले पेट्रोलीग करुन बातमी प्रमाणे कोटे टेम्पोतुन गुटख्याची वाहतुक होत आहे याबाबत खात्री करुन कारवाई करणेबाबत कळविले. त्यानुसार नमुद सर्व अधिकारी व अंमलदार हे भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलींग करीत असताना फालेनगर, लेन नंबर 5 फालेनगर येथील राजन प्रोव्हीजन स्टोअर्स या दुकानाचे समोरील बाजुचे रोडच्या कडेला महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला विमल पान मसाला गुटख्याचा आठ लाख अठावन्न हजार रुपये माल विक्री करण्याकरिता जवळ बाळगल्या प्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतली आहे. त्यांच्या विरोधात भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीकडून गुन्हयाचा पुढील तपास चालु आहे.
पोलीस पथक
अमितेश कुमार पोलीस आयुक्त, पुणे शहर, रंजनकुमार शर्मा पोलीस सह आयुक्त, पुणे शहर,प्रविणकुमार पाटील, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे स्मार्तना पाटील पोलीस उप आयुक्त परिमंडळ -2, राहुल आचारे, सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप आयुक्त, परीमंडळ-2 कार्यालयाकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष कोळी, स्वारगेट पोलीस स्टेशनकडील पोलीस अंमलदार संजय भापकर, कुंदन शिंदे, राहुल तांबे, सागर केकाण व भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे पोलीस उप निरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार महेश बारवकर, मितेश चोरमोले यांच्या पथकाने केली आहे.