पुणे
Trending

Pune Breaking News : पुणे मनपा प्रशासनाचे निषेध नोंदवत हांडेवाडी येथील सोसायट्यांचे महानगरपालिका निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा!

Pune Handewadi Local Take Action On Pune Municipal Corporation : हांडेवाडी परिसरातील नागरिकांना मूलभूत सुविधा नसल्यानं मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा, मनपा आयुक्तांना पत्रातून दिला इशारा

पुणे :- राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर आता काही दिवसातच राज्यातील सर्व प्रमुख महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच पुण्यातील हांडेवाडी परिसरातील नागरिकांनी आता प्रशासनाला इशारा दिला आहे. Pune Handewadi Local Take Action On Pune Municipal Corporation तसेच, हांडेवाडी परिसरातील अनेक सोसायटींनी मनपा आयुक्तांना पत्र लिहून सार्वजनिक महानगरपालिकेच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. हांडेवाडी परिसरातील अनेक वसाहतीतील नागरिकांना सुख सुविधा मिळत नसल्याने नागरिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.

सिपंलीसिटी संस्थांचा सहकारी संघ मर्यादित,धनश्री आशियाना को-ऑप हाऊसिंग सोसायटी,धनश्री आनंद-2 को ऑप हाउसिंग सोसायटी लिमिटेड,मॅजेस्टिक रिदम काऊंटी विंग ए 3 व ए 4 सहकारी गृहरचना संस्था मर्यादित या सोसायट्यांनी पुणे मनपा आयुक्तांना पत्राद्वारे आपला रोष व्यक्त करत बहिष्काराची भूमिका घेतली आहे. हांडेवाडी परिसरातील सोसायटीतील नागरिकांच्या म्हणणे आहे की,

हांडेवाडी परिसरातील विविध सोसायट्यांनी आजपर्यंत बऱ्याच वेळेस महापालिकेतर्फे आकारला जाणाऱ्या प्रॉपर्टी टॅक्स व मूलभूत गरजा असलेल्या सुविधा मिळाव्या म्हणून वारंवार आपणाकडे विनंती केलेली आहे. आज पर्यंत या परिसरातील एकाही सोसायटीला आपल्यातर्फे कुठल्याही सोयी सुविधा तर मिळाल्याच नाहीत त्या उलट जास्तीत जास्त प्रमाणात जिझिया कर लावून सोसायटी रहिवाशांचा उपयोग फक्त प्रॉपर्टी टॅक्स जमा करण्यासाठीच होत असल्याचा भास होतो.

पुणे शहरातील दिवसेंदिवस विकसित होणाऱ्या परिसरांपैकी हांडेवाडी हा एक परिसर असून येथे कुठल्याही सुख सुविधा न मिळणे ही फारच लाजिरवाणी गोष्ट आहे. येथील नागरिकांचे आयुष्य प्रदूषित वातावरणामुळे दिवसेंदिवस कमी होत चालले आहे ही सर्वात मोठी शोकांतिका.

आम्हाला कुठल्याही प्रकारे महानगरपालिकेतर्फे पिण्याच्या व वापरण्याच्या पाण्याचा पुरवठा, मल निसारनाची सुविधा, बाग बगीचे, ओपन ग्राउंड अशा कुठल्याही सुविधा नसताना मोठ्या प्रमाणात टॅक्स आकारला जातो. टॅक्स संदर्भात मागील वर्षी तो कमी करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे अशा पद्धतीचे पत्र महाराष्ट्र शासनाकडून जाहीर करण्यात आले होते त्या पत्राला सुद्धा पुणे महानगरपालिकेतर्फे केराची टोपली दाखवून नव्याने समाविष्ट सर्व गावां केमधून मोठ्या प्रमाणात जटिल व भरमसाठ टॅक्स गोळा करण्याचे साधन म्हणून वापर करण्याचा आपला उद्देश असल्याचा आम्हाला भास होतो व त्यातून मोठा असंतोष निर्माण होत आहे.

आमच्या हांडेवाडी परिसरातील सोसायटींतर्फे स्थापन करण्यात आलेल्या संघात जवळपास साडेपाच हजार फ्लॅट धारक असून, वरील सर्व प्रकरणाचा विचार करता व पुणे महानगरपालिकेतर्फे आम्हास अतिशय तुच्छ वागणूक मिळत असल्यामुळे आम्ही येणाऱ्या सर्व निवडणुकांवर सार्वजनिक बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलेला आहे.

पुणे महानगरपालिकेतर्फे तात्काळ या संदर्भात कुठली कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करावे लागेल व त्याची संपूर्ण जबाबदारी ही पुणे महानगरपालिका तसेच महाराष्ट्र शासन यांची असेल असा इशारा स्थानिक रहिवाशांनी महानगरपालिकेला दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0