क्राईम न्यूज

Pune Breaking News : पुण्यात राजकीय वाद विकोपाला; काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार यांच्यावर हल्ला, तुषार दामगुडेसह तिघांवर गुन्हा

Congress Member Hanumant Pawar : वृत्तवाहिनीच्या चर्चेनंतर मित्रमंडळ चौकात राडा | पिस्तुलाचा धाक दाखवल्याचा आरोप, परवानाधारक शस्त्र जप्त

पुणे :- पुण्यातील राजकारण सोमवारी सायंकाळी पुन्हा एकदा हाणामारीने तापले. एका वृत्तवाहिनीवरील चर्चासत्र संपवून बाहेर पडलेल्या काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार Congress Hanumant Pawar यांच्यावर हिंदुत्ववादी कार्यकर्ते तुषार दामगुडे आणि त्यांच्या साथीदारांनी हल्ला केला. या घटनेत पवार यांना मारहाण करण्यात आली असून, दामगुडे यांनी पिस्तुलाचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा खळबळजनक आरोप पवारांनी केला आहे.

नेमकी घटना काय?

सोमवारी (23 फेब्रुवारी) सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास ‘पुढारी न्यूज’च्या कार्यालयात एका राजकीय विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. यात हनुमंत पवार आणि तुषार दामगुडे सहभागी झाले होते. कार्यक्रम संपल्यानंतर दामगुडे आधी बाहेर पडले, तर पवार फोनवर बोलत बाहेर येत असताना मित्रमंडळ चौकाजवळ आधीच थांबलेल्या दामगुडे आणि त्यांच्या समर्थकांनी पवारांना अडवले.

वादाचे रूपांतर हाणामारीत

हनुमंत पवार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, “तू भाजप आणि संघाला विरोध का करतो? हर्षवर्धन सपकाळ यांची बाजू का घेतो?” असा जाब विचारत दामगुडे यांनी शिवीगाळ सुरू केली. वादाचे रूपांतर लवकरच हाणामारीत झाले. दामगुडे आणि त्यांच्या 3 ते 4 साथीदारांनी पवारांना मारहाण केली. यावेळी दामगुडे यांनी कमरेला असलेले पिस्तूल दाखवून धमकावल्याचा पवारांचा दावा आहे. या हल्ल्याचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले असून त्यात झटापट स्पष्ट दिसत आहे.

पोलिसांची कारवाई आणि शस्त्राची जप्ती

घटनेची माहिती मिळताच काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि कार्यकर्त्यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात धाव घेतली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ कारवाई केली.

गुन्हा दाखल: तुषार दामगुडे, बाळासाहेब गालफाडे, गौरव राठोड आणि इतर दोन-तीन जणांविरुद्ध स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शस्त्र जप्त: तुषार दामगुडे यांचे परवानाधारक पिस्तूल पोलिसांनी जप्त केले आहे.

नोटीस: पोलिसांनी दामगुडे आणि इतरांना चौकशीसाठी नोटीस बजावली असून सध्या त्यांना सोडून देण्यात आले आहे.

तुषार दामगुडे यांचे स्पष्टीकरण

दुसरीकडे, तुषार दामगुडे यांनी मारहाणीचे आरोप फेटाळले असून पवारांनीच आपल्याला चिथावणी दिल्याचे म्हटले आहे. “काही दिवसांपूर्वी एका चर्चेत पवारांनी मला शिवीगाळ केली होती. कालही बाहेर येताना त्यांनी ‘नक्षलवाद्यांकडून तुला संपवून टाकीन’ अशी धमकी दिली, त्यानंतर केवळ शाब्दिक बाचाबाची झाली,” असा दावा दामगुडे यांनी केला आहे.

या घटनेचा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी तीव्र निषेध केला असून, “राज्यात गुंडांचे राज्य सुरू आहे का?” असा सवाल गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारला आहे. स्वारगेट पोलीस सध्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अधिक तपास करत आहेत.

vivek

Recent Posts

मुंबई पालिकेचा ‘महा’बजेट: 80,952 कोटींचा विकास आराखडा! फेरीवाल्यांना आता ‘QR कोड’चे सुरक्षा कवच, तर अनधिकृत बांगलादेशींवर कठोर कारवाई

Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…

12 hours ago

मुंबईचा ‘महा’अर्थसंकल्प: 80,952 कोटींची विकासाची झेप! राखीव निधीतून 13 हजार कोटींचा अंतर्गत डोस, निवडणुकीनंतर पालिकेचा खजिना खुला

Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…

12 hours ago

Supriya Sule : राज्यसभेचा ‘पेच’ सुटणार? शरद पवारांच्या उमेदवारीसाठी सुप्रिया सुळेंचे ‘दिल्ली मिशन’; तर ठाकरेंच्या शिवसेनेचाही जागेवर दावा

•पुढील दोन दिवस पवारांची प्रकृती तपासणी | सुप्रिया सुळे काँग्रेस श्रेष्ठींना भेटणार | 'आदित्य' हट्ट…

18 hours ago