Pune Breaking News : पुण्यात GBS मुळे आणखी एका व्यक्तीचा मृत्यू, 3 नवीन रुग्ण समोर, 21 रुग्ण व्हेंटिलेटरवर

Pune GBS Latest Update : पुण्यात जीबीएसने त्रस्त असलेल्या 37 वर्षीय ड्रायव्हरचा मृत्यू झाला असून, एकूण मृतांची संख्या सात झाली आहे. संशयित रुग्णांची संख्या 192 वर पोहोचली आहे, तर 21 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.
पुणे :- पुण्यात, गुइलेन-बॅरे सिंड्रोमने ग्रस्त असलेल्या 37 वर्षीय ड्रायव्हरचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. Pune GBS Latest News त्यामुळे पुण्यातील या दुर्मिळ न्यूरोलॉजिकल डिसऑर्डरने मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या सात झाली आहे. आरोग्य अधिकाऱ्यांनी सोमवारी (10 फेब्रुवारी) ही माहिती दिली.
दरम्यान, शहरात जीबीएस संसर्गाचे आठ नवीन संशयित रुग्ण आढळून आले असून, एकूण संशयित रुग्णांची संख्या 192 झाली आहे. पुष्टी झालेल्या रुग्णांची संख्या 167 वर पोहोचली असून 21 रुग्ण अजूनही व्हेंटिलेटरवर आहेत.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, मृत हा पुण्यात चालक म्हणून काम करत होता. पायात अशक्तपणा आल्याच्या तक्रारीनंतर त्यांना शहरातील रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले. मात्र, त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना पुण्यातील रुग्णालयात दाखल केले नाही आणि 1 फेब्रुवारी रोजी कर्नाटकातील निपाणी येथे नेले.निपाणीनंतर, कुटुंबीय रुग्णाला सांगली येथील रुग्णालयात घेऊन गेले, जिथे त्याला जीबीएसवर उपचार करण्यासाठी आयव्हीआयजी इंजेक्शन देण्यात आले. मात्र प्रकृतीत सुधारणा न झाल्याने 5 फेब्रुवारी रोजी रुग्णाला पुणे महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात दाखल करण्यात आले.कमला नेहरू रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये दाखल केल्यानंतरही रुग्णाची प्रकृती चिंताजनक होती. 9 फेब्रुवारी रोजी त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचे निधन झाले.



