Pune Eid Rally Latest Update : पुण्यात ईदचा जुलूस 8 तारखेला ; सामाजिक सलोख्याचे वातावरण
पुणे :- पुणे शहरात यंदाचा गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलाद हे दोन्ही सण शांततेत आणि सौहार्दाच्या वातावरणात साजरे व्हावेत, यासाठी पुणे शहर पोलिसांनी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. 5 सप्टेंबर रोजी होणारी मुस्लीम बांधवांची हजरत मोहम्मद पैगंबर जयंती (ईद-ए-मिलाद) मिरवणूक आता पुढे ढकलण्यात आली आहे. Pune Latest News
पोलिसांच्या विनंतीला मुस्लीम बांधवांचा मान, दोन्ही सण शांततेत पार पाडण्याचा प्रयत्न
6 सप्टेंबर रोजी गणेश विसर्जन मिरवणूक असल्याने आणि या दोन्ही मिरवणुका एकाच वेळी आल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, ही बाब लक्षात घेऊन पुणे शहर पोलिसांनी सिरत कमिटी आणि मुस्लीम मंडळाच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेतली. या बैठकीत पोलिसांनी केलेल्या विनंतीला मान देत, मुस्लीम बांधवांनी ईद-ए-मिलादची मिरवणूक 8 सप्टेंबर रोजी काढण्याचा निर्णय घेतला आहे.
या निर्णयामुळे गणेश विसर्जन मिरवणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. दोन्ही समाजांतील प्रतिनिधींनी एकत्र येऊन हा निर्णय घेतल्यामुळे धार्मिक सलोखा राखण्यात आला आहे. यामुळे कोणताही तणाव निर्माण न होता दोन्ही सण शांततेत साजरे करता येतील. पुणे पोलिसांच्या प्रयत्नांमुळे आणि दोन्ही समाजांच्या सहकार्यामुळे पुणे शहराची ‘शांतताप्रिय’ ओळख पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…