Pune ACB News : माजी नागपूर भूमी अभिलेखनाच्या उपसंचालकासह त्यांच्या पत्नीवर एसीबी कडून गुन्हा दाखल..
Pune Anti Corruption Bureau Take Action Against Deputy Director Of Land Records : भुमिअभिलेखाच्या उपसंचालकासह पत्नीवर गुन्हा दाखल, एकूण मालमत्तेपेक्षा 18.74% बेहिशोबी मालमत्ता असल्याने गुन्हा दाखल
पुणे :- नागपूर भूमी अभिलेखाच्या तात्कालीन उपसंचालकासह Deputy Director Of Land Records त्यांच्या पत्नी यांच्यावर येरवडा पोलीस ठाण्यात Yerwada Police Station लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून गुन्हा Pune Anti Corruption Department दाखल करण्यात आला आहे. नागपूर भूमी अभिलेखनाचे तात्कालीन उपसंचालक दादाभाऊ सोनू तळपे (62 वर्ष, सेवानिवृत्ती), Dada Bhau Sonu Talpe आणि त्यांच्या पत्नी कल्पना दादाभाऊ तळपे (58 वर्ष) Kalpana Dada bhau Talpe त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Pune Anti Corruption Bureau Latest News
दादाभाऊ तळपे यांनी संपादित केलेल्या मालमत्तेबाबत पुणे एसीबी कार्यालयाकडून उघड चौकशी करण्यात आली होती. तळपे यांनी संपादित केलेल्या मालमत्ता कायदेशीर पद्धतीने संपादित केल्या आहेत की नाही? याबाबत त्यांना वेळोवेळी संधी देऊन माहिती देण्यास सांगितले होते. मात्र, तळपे यांनी संपादित केलेल्या मालमत्तेबाबत उपयुक्त पुरावे ते सादर करु शकले नाहीत. त्यांनी भूमी अभिलेख विभागात कार्यरत असताना आपल्या कार्यकाळात कायदेशीर उत्पन्नापेक्षा स्वतःच्या व पत्नीच्या नावे 28 लाख 52 हजार 541 (ज्ञात उत्पन्नापेक्षा 18.74 टक्के) किंमतीची अपसंपदा भ्रष्ट मार्गाने जमवल्याचे चौकशीत निष्पन्न झाले.बेहिशोबी मालमत्ता संपादित करण्यासाठी दादाभाऊ तळपे यांना त्यांची पत्नी कल्पना तळपे यांनी अपप्रेरणा दिली. तसेच गुन्हा करण्यास प्रोत्साहित केले. त्यामुळे पुणे एसीबीने दोघांवर येरवडा पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कलम 13(1) (ई), 13 (2) सह भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, भादंवि 109 नुसार गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक श्रीराम शिंदे करत आहेत. याप्रकरणी पुणे एसीबी चे पोलीस निरीक्षक प्रवीण निंबाळकर यांनी फिर्यादी दिली आहे. Pune Anti Corruption Bureau Latest News