Pune Anti Corruption Bureau News : लाचखोर पोलीस उपनिरीक्षक एसीबीच्या जाळ्यात
Pune Anti Corruption Bureau News : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांची कारवाई ;पाच लाखांची लाच मागितल्याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षकाविरुध्द गुन्हा,वीज मीटर चोरीच्या गुन्ह्यात कारवाई न करण्यासाठी मागितलेली लाच
पुणे :- वीज मीटर चोरीच्या गुन्ह्यात कारवाई Crime In Electricity Bill न करण्यासाठी पाच लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षकाविरुध्द चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा Chandan Nagar Police Station दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधकच्या पुणे Pune Anti Corruption Bureau विभागाने शुक्रवारी (17 मे) ही कारवाई केली.
दत्तात्रेय सर्जेराव शेगर असे त्या पोलिस उपनिरीक्षकाचे नाव आहे. ‘एसीबी’चे पोलिस उपअधीक्षक नितीन जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महावितरण विभागात नोकरीस आहेत. तक्रारदाराविरुध्द चंदननगर पोलिस ठाण्यात वीज मीटर चोरीचा गुन्हा दाखल आहे. या पोलिस ठाण्यात कार्यरत पोलिस उपनिरीक्षक शेगर यांनी पुढील कारवाई न करण्यासाठी तक्रारदाराकडे पाच लाख रुपयांची मागणी केली. Pune Anti Corruption Bureau Latest News
तडजोडीअंती तीन लाख रुपये लाचेची मागणी केली, असा अर्ज तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात दिला. ‘तक्रारदार यांनी पुणे एसीबीकडे याबाबत तक्रार केली. एसीबीच्या पथकाने पडताळणी केली असता पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय शेगर यांनी तक्रारदार यांच्या विरुद्ध चंदननगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या मिटर चोरीच्या गुन्ह्यात कारवाई न करण्यासाठी पाच लाख रुपये लाच मागून तीन लाख रुपये स्वीकारण्याचे मान्य केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार एसीबीने पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय शेगर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक रुपेश जाधव करीत आहेत. Pune Anti Corruption Bureau Latest News