पुणे : आरोपीकडून न्यायालयाचे बनावट आदेश ; विधानसभेत पडसाद : वकिलांचा सहभाग तपासला जाणार?

नाना पटोले यांचे गंभीर आरोप!
पुणे :- कायद्याचा बट्ट्याबोळ झाल्याची घटना समोर आली आहे. विमानतळ पोलिस ठाण्यात Pune Vimantal Police Station दाखल गुन्ह्यात आरोपी कडून न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या आदेशाची खोटी ऑर्डर सादर करत जामीन मिळवल्याची घटना समोर आली आहे. पुण्यातील विमानतळ पोलिस ठाण्यात ही घटना घडली आहे. पुण्यातील सीटीआर मॅन्युफॅक्चरिंग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने 2022 मध्ये एका विमानतळासाठी टेंडर भरले होते. मात्र, टेंडर उघडताच त्यांचे डिझाईन आणि डायग्राम चेन्नईच्या इसन-एमआर प्रा. लि. कंपनीने काही कर्मचाऱ्यांच्या मदतीने कॉपी केल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे सीटीआर कंपनीने जानेवारी 2022 मध्ये पुणे विमानतळ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून इसन-एमआर कंपनीचे उच्चपदस्थ अधिकारी रवीकुमार रामास्वामी, हरिभाऊ चेमटे आणि आणखी तीन जणांना अटक करण्यात आली होती.
संपूर्ण प्रकरणाची एका वृत्तवाहिनीने पडताळणी केली तेव्हा हे गंभीर वास्तव समोर आलं. आरोपींनी प्रक्रियेनुसार पुणे येथील दिवाणी न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला. आरोपींनी मुंबई उच्च न्यायालयात अंतरिम जामीनासाठी अर्ज केला. तिथे उच्च न्यायालयाची फसवणूक करीत खोटे निकालपत्र आरोपीच्या वतीने सादर करीत आरोपींनी जामीन मिळवला. चार्जशीट वर आरोपींनी न्यायाधीशांच्या आदेश सुद्धा लिहला. या आदेशावरचा मसुदा तांत्रिक भाषेत लिहला गेला होता ज्यामध्ये यातील आरोपींवर लागलेलं सर्व गुन्हे रद्द झाल्याचे नमूद होतं. इतकचं काय तर पुणे न्यायालयातील न्यायाधीशांची बनावट सही सुद्धा केली. पुणे न्यायालयातील न्यायाधीशांनी आरोपींना निर्दोष सोडणारा हाताने लिहिलेला निकाल आणि त्यावरची सही आपली नाही, हे सांगितल्याने सीटीआर कंपनीने तत्काळ पुन्हा मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली.