क्राईम न्यूजपुणे
Trending

पुणे : गावठी कट्टा आणि दोन जिवंत राऊंडसह आरोपी अटकेत

Kharadi Police Staion Seized Gun From Criminal: आचारसंहितेचा भंग करुन गावठी कट्टा जवळ बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराच्या खराडी पोलीसांनी आवळल्या मुसक्या

पुणे :- ईवॉन आय.टी. पार्क, फेज-2 खराडी, पुणे येथील एका तरुणाला गावठी कट्टा बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली. Pune Police यावेळी त्याच्याकडून गावठी कट्टा Gavathi Karta आणि दोन जिवंत राऊंड पोलिसांनी जप्त केले आहेत. याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आदित्य अतिश मोहिते (वय 21 रा. रामवाडी, येरवडा पुणे) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहितेचा भंग करून गावठी कट्टा जवळ बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला खराडी पोलिसांनी अटक केली आहे. खराडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राहुल कोळपे, पोलीस हवलदार महेश नाणेकर, अमोल भिसे, पोलिस अंमलदार प्रफुल मोरे, अमोल जाधव, सुरज जाधव, श्रीकांत कोद्रे हे पोलिसांचे पथक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खाजगी वाहनाने पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार सुरज जाधव आणि श्रीकांत कोद्रे यांच्या गुप्त बातमीदारा मार्फत मिळालेल्या बातमीनुसार एका रेकॉर्डवरील आरोपी असलेला सराईत गुन्हेगार खराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ईवॉन आय.टी. पार्क, फेज-2, खराडी, पुणे येथे पिस्टल घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांच्या वरिष्ठ मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने सापळा रचून आरोपी आदित्य मोहिते याला ताब्यात घेतले.त्याची अंगझडती घेतली असता त्याचे कंबरेला पेंटचे आतून गावठी कट्टा लावल्याचे व पॅन्टचे उजवे खिशात दोन राऊंड ठेवल्याचे दिसल्याने ते पोलीसांनी ताब्यात घेतले व त्याला अटक केली आहे. आरोपीने पिस्टल व जिवंत राऊंड कोठून व कशासाठी आणले? तो कोणाचा घातपात करणार होता का? याबाबतचा अधिक तपास वैशाली तांगडे महिला पोलीस उप-निरीक्षक खराडी पोलीस ठाणे, पुणे शहर या करत आहेत

पोलीस पथक
मनोज पाटील अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर हिम्मत जाधव, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ -4, पुणे शहर, प्रांजली सोनवणे, सहाय्यक पोलीस आयुक्त, येरवडा विभाग यांचे मार्गदर्शनाखाली संजय चव्हाण वरिष्ठ पोलीस निरीक्षक खराडी पोलीस ठाणे पुणे शहर, सहाय्यक पोलीस निरीक्षक सिध्दनाथ खांडेकर, तपास पथक प्रमुख पोलीस उप-निरीक्षक राहुल कोळपे, महिला पोलीस उपनिरीक्षक वैशाली तांगडे, पोलीस अंमलदार महेश नाणेकर, अमोल भिसे, सचिन घोलप, प्रफुल गोरे, अमोल जाधव, सचिन पाटील, श्रीकांत कोद्रे, व सुरज जाधव, यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0