Pune Accident Case : गुन्हेगारांना वाचवणारा अड्डा.. ससून रुग्णालय…. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार
Vijay Wadettiwar On Pune Accident Case : ससून रुग्णालयातील डॉक्टरांनी हिट अँड रन प्रकरणातील आरोपीच्या ब्लड रिपोर्ट मध्ये छेडछाड, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्याकडून संतापजनक प्रतिक्रिया
पुणे :- कल्याणी नगरमध्ये भरधाव वेगात आलेल्या पोर्शे कारने बाईकला धडक Pune Accident Case दिल्याने दोघांचा मृत्यू झाला. दारूच्या नशेत 17 वर्षीय अल्पवयीन कार चालवत होता. याप्रकरणी रोज नवनवीन खुलासे होत आहेत. आता पुणे पोलिसांनी ब्लड रिपोर्टमध्ये छेडछाड केल्याप्रकरणी दोन डॉक्टरांना अटक केली आहे.पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले की, ब्लड रिपोर्टमध्ये छेडछाड केल्याच्या आरोपाखाली ससून जनरल हॉस्पिटलच्या दोन डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे. ससुनचे डॉ अजय तावरे व डॉ श्रीहरी हरलोर यांना अटक करण्यात आली आहे. पुणे पोलिसांनी ही कारवाई केली. या सर्व घडामोडींवर राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार Vijay Wadettiwar यांनी संताप जनक प्रतिक्रिया दिली आहे. ससून रुग्णालय हे गुन्हेगारांना वाचवणारा अड्डा झाल्याचे सांगितले आहे. Pune Porsche car accident Latest Update
राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी ट्विट करत सरकारला धारेवर धरले आहे. ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की,पुण्यातील ससून रुग्णालय हे रुग्णालय आहे की ‘गुन्हेगारांना वाचवणारा अड्डा ‘ आहे?
- आधी ललित पाटीलचे धंदे याच हॉस्पिटल मधून सुरु होते. ललित पाटीलचे अवैध धंदे सरकारमधील कोणत्या मंत्र्याच्या आशीर्वादाने सुरू होते हे महाराष्ट्राला माहिती आहे
- आता पुण्याच्या आरोपीला वाचवण्यासाठी ससून रुग्णालयातील डॉक्टरांनी ब्लड रिपोर्ट मध्ये फेरफार केली.
- हे हॉस्पिटल गुंड आरोपी यांच्यासाठी आहे का?
- ललित पाटील प्रकरणापासून या हॉस्पिटलच्या कारभारावर आधीच शंका होती, पण सरकार आणि रुग्णालय प्रशासनाने ह्या शंकेवर शिक्कमोर्तब केले.
- पुणे ‘हिट अँड रन’ प्रकरणात पूर्ण व्यवस्थेने आरोपीला मदत केली आहे. दारू पिऊन दोन लोकांची हत्या करणाऱ्याला मदत करण्यासाठी किती जणांनी मेहनत घेतली हे समोर येत आहे
- या सर्वांना कठोर शिक्षा व्हायला हवी. म्हणून आम्ही न्यायिक चौकशीची मागणी करत आहोत. पोलिस ते हॉस्पिटल सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे.
Web Title : Pune Accident Case : Shelter to save the criminals.. Sassoon Hospital…. Leader of Opposition Vijay Wadettiwar