क्राईम न्यूजपुणे
Trending

Pune ACB Trap News : “महावितरणचा अभियंता ‘करप्ट कनेक्शन’सह पकडला!”

Pune Anti Corruption Bureau Arrested Bribe Man :‘वीज जोडणी’चं कारण, पण मागणी भ्रष्ट पैशांची – एसीबीच्या सापळ्यात दोघेही गजाआड

पुणे :- वीज जोडणी मंजूर करून देण्यासाठी तब्बल 25 हजार रुपयांची लाच मागणाऱ्या महावितरणच्या सहाय्यक अभियंत्याचा भ्रष्टाचाराचा ‘करंट’ अखेर पोलिसांनी बंद केला. पुण्यातील भोसरी विभागात एसीबीच्या पथकाने अचूक सापळा रचत त्याला व त्याच्या साथीदार खाजगी इसमाला रंगेहाथ अटक केली.

तक्रारदार हे एक शासकीय विद्युत कॉन्ट्रॅक्टर असून, त्यांनी एका ग्राहकासाठी घरगुती वीज जोडणीसाठी अर्ज दाखल केला होता. सदर अर्जावर कार्यवाही करताना सहाय्यक अभियंता रामप्रसाद नरवडे याने थेट 35 हजार रुपयांची मागणी केली. तडजोडीनंतर सौदा 25 हजारांवर आला.

5 जून 2025 रोजी, तक्रारदाराने ठरल्याप्रमाणे लाचरक्कम अभियंत्याच्या सांगण्यानुसार श्यामलाल असोकन या खाजगी इसमाला दिली. आणि याच क्षणी, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोघांनाही जेरबंद केलं.

तपास व सापळा कारवाईत सहभागी अधिकारी

शिरीष सरदेशपांडे,पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे परिक्षेत्र,डॉ. शीतल जानवे / खराडे,अपर पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे विजय चौधरी,अपर पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे दयानंद गावडे,पोलीस उप अधीक्षक व पर्यवेक्षण अधिकारी, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रसाद लोणारे,पोलीस निरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे – सापळा कारवाईचे प्रमुख अधिकारी पोलीस शिपाई भूषण ठाकूर, रवी दिवेकर, महिला पोलीस शिपाई सुप्रिया काळे व चालक चंद्रकांत कदम – यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0