पुणे, दि. ७ ऑगस्ट, महाराष्ट्र मिरर
मुबारक जिनेरी | Pune Crime News, Pune Police, Pune Police Iron Man
राजकीय दबाव, वरिष्ठ अधिकाऱ्यांचा घेराव, आमदार सामाजिक कार्यकर्ते ठाण मांडून पोलिसांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यासाठी पोलीस आयुक्तालयात ‘प्रेशर’ निर्माण करीत असताना पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी कणखर ‘लोहपुरुष’ भूमिका घेत पुणे पोलिसांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे दाखवून दिले. प्रथमच मोठ्या राजकीय दबावाला बळी न पडता पोलिसांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचे ‘धाडस’ पुण्याच्या इतिसाहत बघायला मिळाले. ‘लोहपुरुष’ अमितेश कुमार यांच्या कणखर भूमिकेने पुणे पोलीस दलाला स्फुर्ती मिळाली आहे. Pune Crime News, Pune Police Iron Man
पोलिसांच्या चुकीला माफी नाही पण पोलिसांवर अन्याय देखील होऊ द्यायचा नाही अशी सडेतोड भूमिका पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिली आहे.
पुणे शहरात बोकाळलेल्या अवैध धंद्यांना खतपाणी घालणाऱ्या स्पेशल @६५ चा बिमोड करून पोलिसांना त्यांच्या कर्तव्य आणि निष्ठेची जाण पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी करून दिली. अवैध धंदे रोखण्यासाठी पोलीस दलात मोठे फेरबदल पोलीस आयुक्तांनी केले. पारदर्शक, स्वच्छ कारभारासाठी पुणे पोलीस आयुक्त म्हणून जनमानसात त्यांची ख्याती निर्माण झाली आहे.
एकाच ठिकाणी वर्षानुवर्षे राहून मक्तेदारी निर्माण करणाऱ्या खात्यातील वृत्तीचा पोलीस आयुक्तांनी बंदोबस्त करून सर्व सामान्यांना न्याय दिला आहे. पोलीस आयुक्तांचे निर्णय पुणे पोलीस दलासाठी दुरोगामी फायदेशीर ठरणार आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची ‘संगीतखुर्ची’ हा याचाच एक भाग आहे.
कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पुणे पोलीस दल कटिबद्ध असताना अन्यायाला सर्मथन, प्रोत्साहन देणाऱ्या, चुकीचे काम करणाऱ्या पोलिसांविरुद्ध पोलीस आयुक्तांनी कडक पाऊले नेहमीच उचलली आहेत. पोर्शे कार अपघात बिल्डर विशाल अगरवाल याच्या प्रकरणात दोषी असणाऱ्या पोलिसांवर आयुक्तांनी कारवाई केलीच आहे. त्याचपद्धतीने पोलिसांवर अन्याय देखील होऊ द्यायचा नाही अशी भूमिका देखील धाडसीपणे निभावलेली आहे.
पुणे शहराला व पुणे पोलीस दलाला अशा ‘लोहपुरुष’ पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची गरज आहे. न्याय, कर्तव्य, कायदा व सुव्यवस्था, पारदर्शकपणा याचे मुर्तिमंद प्रतीक पोलीस आयुक्त अमितेश कुमार ठरत आहेत.
Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…
Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…
Pune Swargate Case : पुणे पोलिसांचा ऐतिहासिक तपास | अश्लील व्हिडिओची गुगल हिस्टरी आणि बसमधील…
Rohit Pawar On DGCA And Central Minster : व्हीएसआर कंपनीला वाचवण्यासाठी दिल्लीतून हालचाली? | 28…
•पुढील दोन दिवस पवारांची प्रकृती तपासणी | सुप्रिया सुळे काँग्रेस श्रेष्ठींना भेटणार | 'आदित्य' हट्ट…
Sanjay Raut On MVA : राज्यसभेच्या एका जागेसाठी मविआची रणनीती | 'मुंडवा जमीन घोटाळा' अद्याप…