Pune Ashwini Kedari Passes away: गीझरचा शॉक लागून 80% भाजल्या, 11 दिवस मृत्यूशी झुंज अपयशी; खेड तालुक्यातील शेतकऱ्याच्या मुलीच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा
पुणे :- पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातून एक अतिशय हृदयद्रावक बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) पोलीस उपनिरीक्षक (PSI) परीक्षेत मुलींमध्ये राज्यात सर्वप्रथम आलेल्या अश्विनी केदारी (वय 22) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. Pune Ashwini Kedari Passes away बाथरूममध्ये इलेक्ट्रिक हीटरचा (गीझर) शॉक लागून त्या गंभीररित्या भाजल्या होत्या आणि 11 दिवसांच्या मृत्यूशी झुंजीनंतर त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या अकाली निधनाने संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही दुर्दैवी घटना 28 ऑगस्ट रोजी घडली. सकाळी अभ्यासासाठी लवकर उठलेल्या अश्विनीने आंघोळीसाठी पाणी गरम करायला ठेवले होते. पाणी किती गरम झाले आहे हे पाहण्यासाठी त्या बाथरूममध्ये गेल्या असता, त्यांना हीटरचा जोरदार इलेक्ट्रिक शॉक बसला. या शॉकमुळे उकळते पाणी त्यांच्या अंगावर सांडले आणि त्या सुमारे 80 टक्के भाजल्या.
अपघाताची गंभीरता लक्षात येताच कुटुंबीयांनी त्यांना तातडीने पिंपरी-चिंचवड येथील डी. वाय. पाटील रुग्णालयात दाखल केले. गेल्या 11 दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्रकृती बिघडत गेली आणि अखेर आज त्यांचा मृत्यू झाला.
अश्विनी केदारी या खेड तालुक्यातील पाळू येथील एका शेतकरी कुटुंबातील होत्या. प्रचंड कष्ट घेऊन त्यांनी PSI परीक्षेत यश मिळवले होते. त्यांच्या या यशाचे सर्वत्र कौतुक झाले होते आणि त्या अनेक मुलींसाठी प्रेरणास्थान बनल्या होत्या. आता त्यांच्या अकाली मृत्यूने कुटुंबीयांवर आणि खेड तालुक्यावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनाने एका कर्तृत्ववान अधिकाऱ्याला महाराष्ट्र मुकला आहे, अशी भावना सर्व स्तरांतून व्यक्त होत आहे
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…