मुंबई

Dipesh Mhatre : कचरा शुल्क वाढीविरोधातील मोर्चा पोलिसांच्या रडारवर; दीपेश म्हात्रेंसह 125 शिवसैनिकांवर गुन्हा दाखल

Dipesh Mahtre Fir : शिवसेनेचा पालिकेविरोधात जोरदार मोर्चा; घोषणाबाजी करत प्रवेशद्वारावर धडक

कल्याण | कल्याण डोंबिवली महापालिकेने KDMC कचऱ्यावर लावलेल्या वाढीव शुल्काविरोधात ठाकरे गटाच्या वतीने गेल्या आठवड्यात डोंबिवली जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांच्याDipesh Mahtre नेतृत्वाखाली 200 हून अधिक शिवसैनिकांनी पालिका मुख्यालयावर मोर्चा काढला.

या मोर्चादरम्यान पोलिसांनी घालून दिलेल्या अटीशर्तींचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत बाजारपेठ पोलीस ठाण्यात दीपेश म्हात्रेसह 9 पदाधिकारी व 125 शिवसैनिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हवालदार विशाल चौधरी यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून, कल्याण पालिकेच्या अन्नवस्तू शुल्कातील वाढ अन्यायकारक असल्याने हा आंदोलनात्मक मोर्चा पुकारण्यात आला होता. साहाय्यक पोलीस आयुक्तांनी अटीशर्ती घालून मोर्चाला परवानगी दिली होती.

मात्र, मोर्चेकऱ्यांनी पालिकेच्या प्रवेशद्वारावर घोषणाबाजी करत प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली. “कचरा शुल्क वाढ रद्द करा”, “आयुक्त हाय हाय”, “शासन आम्हाला घाबरते, पोलिसांना पुढे करते” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.

प्रशासकीय इमारतीत घुसण्याचा प्रयत्न केल्याने आणि मनाई आदेशाचा भंग करत कायदा-सुव्यवस्थेला धोका निर्माण केल्याच्या आरोपांखाली दीपेश म्हात्रे, विजय साळवी, बाळा परब, साईनाथ तारे, वैशाली दरेकर, अल्ताफ शेख यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला आहे.

जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे मागील दोन महिन्यांपासून कचरा शुल्कवाढ रद्द करण्याची मागणी सातत्याने करत असून, प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे आंदोलनाचा मार्ग पत्करल्याचे पक्षाच्या वतीने सांगण्यात आले.

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

4 hours ago