पुणे

Daund News : जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून दौंड तालुक्याचे योग्य नियोजन ; जिल्ह्याचे नियोजन करतांना प्रत्येक घटकाला न्याय देणार ; पालकमंत्री अजित पवार यांची ग्वाही

[ पुण्याच्या ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा अधिक सक्षम होण्यास मदत ]

Daund Latest News : दौंड, ता. १ पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit Pawar यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीप्रसंगी दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल यांनी उपस्थित राहून मतदारसंघातील तसेच समग्र जिल्ह्यातील विविध प्रश्नांच्या अनुषंगाने आपल्या मागण्या पालकमंत्री अजित पवार यांच्यासमोर उपस्थित केल्या.


सदर बैठकीत आपल्या मागण्या मांडत असताना आमदार राहुल कुल यांनी सांगितले की पुणे सोलापूर व पुणे नगर महामार्गावरील वाहतूक कोंडीचे नियोजन करण्यात यावे. तसेच पुणे – सोलापूर महामार्गावरील नियोजित हडपसर ते कासुर्डी दुमजली उड्डाणपूल हा रेसकोर्स ते चौफुला ( ता. दौंड ) पर्यंत करण्यात यावा. आणि लोणी काळभोर पर्यंत मेट्रो मार्गीकेची आखणी करण्यात यावी. तसेच जिल्हा परिषदेच्या शाळांच्या इमारतीसाठी संपूर्ण जिल्ह्यात सर्वेक्षण करण्यात यावे आणि आवश्यक निधीची तरतूद करण्यात यावी तसेच जिल्ह्यातील विविध प्रश्नांच्या अनुषंगाने आपल्या मागण्या पालकमंत्री अजित पवार यांच्यासमोर उपस्थित केल्या.
पालकमंत्री अजित पवार म्हणाले की शिक्षण आणि महामार्गावरील वाहतूक नियोजन या घटकांसाठी प्राधान्य देण्यात येईल. तसेच जिल्ह्याचे नियोजन करतांना सर्व घटकांना न्याय देण्याचा आमचा प्रयत्न आहे. यंञणांनी सर्व कामे वेळेत व गुणवत्तापूर्ण करावी. तसे न झाल्यास जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. नियोजन समितीच्या झालेल्या चर्चेत जिल्ह्यातील सर्व मंञी, खासदार, आमदार, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महानगर पालिका आयुक्त तसेच जिल्हा प्रशासनातील सर्व खात्यांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. या माध्यमातून पुण्याच्या ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा अधिक सक्षम होण्यास मदत होईल. उपस्थित सर्व आमदार, सदस्य यांनी सहभाग घेऊन मौलिक सुचना मांडल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0