उरण महाराष्ट्र मिरर : अजून विधानसभेचा गुलाल खाली बसला नाही तर शेकापचे नेते उरण विधानसभे Uran Vidhan Sabha Election मध्ये लढत देत निसटता पराभव स्वीकारावा लागलेले नेते प्रितम म्हात्रे Pritam Mahtre यांनी पनवेल तालुक्यातील तुराडे गावच्या ग्रामपंचायत सदस्य सौ.वाघमारे यांच्या मुलीच्या साखरपुडा कार्यक्रमाला उपस्थित राहून कालच निवडणूक निकाल लागुन पराभव झाला असला तरी तो खेळाडू वृत्तीने स्वीकारत आपण जिगरबाज आहोत हे दाखवून देत कार्यक्रमास उपस्थित राहिले कार्यक्रमाच्या ठिकाणी गाडीमधून प्रितम म्हात्रे खाली उतरताच कार्यकर्त्यांनी गाडीला गराडा घालून आपल्या जिगरबाज नेत्याला अभिवादन केले. चेहऱयावर पराभवाचे सावट सुद्धा नव्हते. स्मितहास्य चेहरा पाहून कार्यकर्त्यांच्या डोळयांच्या कडा पाणवल्या. विधानसभा निवडणुकीच्या निकालाला 24 तास सुद्धा झाले नसताना प्रितम म्हात्रे यांनी पायाला भिंगरी बांधून मतदार संघ पिंजायला सुरवात केली आहे. याची गोळा बेरीज त्यांना आगामी स्थानिक स्वराज संस्थाच्या निवडणुकीत कामाला येणार आहेत. नेता हा जनसामान्य जनतेला आपला वाटणारा असावा याचे आज जमलेल्या जनतेने अनुभवले कार्यक्रमाच्या ठीकाणी असणारया जेवणासाठी प्रितम म्हात्रे पंगतीमध्ये जाऊन बसले. त्यांची ही कृती पाहून युवकांनी त्याचे फोटो काढून आपले स्टेटस ला ठेवले आहेत. त्यांचा हा साधेपणा पाहून महिला वर्गामध्ये त्यांच्या साधेपणाची चर्चा चांगलीच रंगली. झालेला पराभव स्वीकारत मतदारसंघात पुन्हा भेटीगाठी सुरू केलेले प्रितम म्हात्रे खऱ्या अर्थाने जननायक ठरले. उरण मतदारसंघात त्यांनी दोन नंबरची 88,878 मते मिळवत महाविकास आघाडीला तिसऱ्या क्रमांकावर ठेवले. लोकसभेत केलेल्या कामाच्या बद्दल मोठेपणा दाखवत जर शिवसेनेने शेकापला उमेदवारी दिली असती तर आज 50,000 पेक्षा जास्त मतांच्या फरकाने प्रितम म्हात्रे विजयी झाले असते अशी चर्चा उपस्थितांमध्ये होती.
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…