“शेकाप नेते प्रितम जनार्दन म्हात्रेंचा यशस्वी पाठपुरावा”
उरण – गेल्या वर्षभरापासून सिडको CIDCO आणि रेल्वे प्रशासन Railway यांच्यात बामणडोंगरी Bamandongri आणि खारकोपर रेल्वे स्टेशन Kharkopar Railway Station येथील सुविधां संदर्भात फक्त पत्र व्यवहार होत होता. पाण्याची व्यवस्था सुरळीत नसल्यामुळे तेथील शौचालये बंद आहेत. त्याचा त्रास रेल्वे प्रवाशांना सहन करावा लागत होता.
हा विषय शेतकरी कामगार पक्षाचे नेते आणि पनवेल महानगरपालिकेचे मा.विरोधी पक्षनेते श्री.प्रितम जनार्दन म्हात्रे Pritam Janardan Mhatre यांना आम्ही उलवेकर मित्र मंडळ आणि रेल्वे प्रवाशांनी सांगितला त्यासोबतच इतर समस्या सुद्धा त्यांच्यासमोर मांडल्या होत्या.
त्यावर कार्यवाही म्हणून त्वरित उलवे परिसरातील पाण्याची समस्या आणि इतर सिडकोची अपुरी विकास कामे यासंदर्भात समस्या निवारणासाठी त्यांनी रायगड भवन येथे संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यातून सकारात्मक निर्णय झाले त्यावर त्यांना त्वरित कार्यवाही करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले. त्यानुसार सिडको ने कार्यवाही केली आहे. बामणडोंगरी आणि खारकोपर रेल्वे स्टेशन येथील पाण्याच्या कनेक्शन अभावी बंद असलेले शौचालय आज पाणी जोडणी झाल्यामुळे पुन्हा सुरू करण्यात आले आणि रेल्वे प्रवाशांना विशेषतः महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना दिलासा मिळाला.
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…
Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…
Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…