मुंबई

Pravin Darekar : पुन्हा एकदा लिफ्टमध्ये अडकले आमदार प्रवीण दरेकर!

Pravin Darekar : “लिफ्टची आणि माझी जुनी दुश्मनी” – दरेकरांचा हलकाफुलका टोमणा

वसई | विधान परिषदेतील भाजपचे गटनेते आणि मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण Pravin Darekar दरेकर रविवारी पुन्हा एकदा लिफ्टमध्ये अडकले. वसईतील कौल हेरिटेज सिटी येथे स्वयंपुर्नविकास मार्गदर्शन शिबिरासाठी जात असताना ही घटना घडली. लिफ्ट अचानक बंद पडल्याने दरेकर सुमारे 20 मिनिटे लिफ्टमध्ये अडकून राहिले. अखेर पोलिसांच्या मदतीने लिफ्टचे दरवाजे उघडून त्यांची सुटका करण्यात आली.

कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना दरेकर म्हणाले, “लिफ्टची आणि माझी दुश्मनी काही जुनीच आहे. याआधी भिवंडीच्या कार्यक्रमातही मी अर्धा तास अडकलो होतो. मंदा म्हात्रे यांना अक्षरशः घाबरून फेस आला होता. आणखी थोडा वेळ लागला असता, तर मोठा अनर्थ झाला असता.”
त्यांनी याप्रकरणी इमारतीतील लिफ्ट व्यवस्थापनाच्या गंभीर त्रुटीवर बोट ठेवत, अशा घटनांकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे, असे मत व्यक्त केले.

कार्यक्रमाची गडबड, पण मार्गदर्शन पूर्ण

या अप्रिय घटनेनंतरही दरेकरांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून स्वयंपुर्नविकास संदर्भातील मार्गदर्शन केले. स्थानिकांनी त्यांच्या संयमाचे कौतुक केले असून, लिफ्टच्या देखभालीकडे अधिक गांभीर्याने पाहण्याची मागणी यानिमित्ताने जोर धरू लागली आहे.

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

30 minutes ago

मुंबई पालिकेचा ‘महा’बजेट: 80,952 कोटींचा विकास आराखडा! फेरीवाल्यांना आता ‘QR कोड’चे सुरक्षा कवच, तर अनधिकृत बांगलादेशींवर कठोर कारवाई

Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…

18 hours ago

मुंबईचा ‘महा’अर्थसंकल्प: 80,952 कोटींची विकासाची झेप! राखीव निधीतून 13 हजार कोटींचा अंतर्गत डोस, निवडणुकीनंतर पालिकेचा खजिना खुला

Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…

18 hours ago