Chandrapur Lok Sabha Election 2024 : चंद्रपूरच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांच्या डोळ्यात अश्रू, दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या आठवणीने अश्रू अनावर
2024 Chandrapur Lok Sabha Election : चंद्रपूर महा विकास आघाडीच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर Pratibha Dhanorkar यांच्या अश्रू अनावर, दिवंगत खासदार बाळू धानोरकर Balu Dhanorkar यांचा आशीर्वाद सदैव सोबत आहे, प्रतिभा धानोरकर
चंद्रपूर :- चंद्रपूरच्या महाविकास आघडीच्या Chandrapur MVA Member उमेदवार प्रतिभा धानोरकर Pratibha Dhanorkar यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. दिवंगत खासदार बाळू धानोरकर Balu Dhanorkar यांच्या आठवणीत त्यांचे डोळे पाणावल. Get Emotional याच केंद्रावर आम्ही जोडीने मतदान करायचो आज मात्र त्यांची उणीव जाणवते आहे.चंद्रपूरमध्ये मतदान Chandrapur Lok Sabha Election केल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
डोळ्यांतील अश्रू पुसत प्रतिभा धानोरकर यांनी नागरिकांना मतदानाचे आवाहन केले. त्या म्हणाल्या, आपल्या भागात मोठ्या प्रमाणात उन्हाचा तडाखा आहे, अशातही मतदान करणं आपला नैतिक अधिकार आहे. लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी प्रत्येकाने आपला अधिकार बजवावा” असे आवाहन त्यांनी केले. Chandrapur Lok Sabha Election Updates 2024
संविधानाचा सन्मान करण्याचा दिवस त्या म्हणाल्या, “आजचा दिवस माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा, आनंदाचाही आहे तर दुसरीकडे दुःखाचा दिवसही आहे. कारण प्रत्येकवेळी याच केंद्रावर मी आणि दिवंगत खासदार बाळू धानोरकर जोडीने मतदान करायचो. आज त्यांची उणीव जाणवत आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर Dr. Baba Saheb Ambedkar यांनी दिलेल्या संविधानाचा सन्मान करण्याचा दिवस आहे. या उत्सवात आनंदाने सामील झाले पाहिजे. या उत्सवात सामील होऊन खऱ्या अर्थाने लोकशाहीचा मान ठेवला पाहिजे”, असे मत प्रतिभा धानोरकर यांनी व्यक्त केले. Chandrapur Lok Sabha Election Updates 2024
धानोरकर यांना मुनगंटीवार यांचे आवाहन
दरम्यान, 2024 च्या लोकसभा निवडणुकीत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार Sudhir Mungantiwar यांच्या समोर आमदार प्रतिभा धानोरकर यांचे आव्हान आहे. मुनगंटीवार सलग सहा वेळा निवडून येणारे आमदार आहेत. दरम्यान, महाराष्ट्रातील एकूण पाच मतदारसंघांत आज मतदान पार पडणार आहे. त्यात नागपूर, रामटेक, चंद्रपूर, गडचिरोली- चिमूर व भंडारा- गोंदिया या मतदारसंघांचा समावेश आहे Chandrapur Lok Sabha Election Updates 2024