Pratap Sarnaik : मुंबईत कॉलेजने ‘ड्रेस कोड’ लागू केल्यावर शिवसेना आमदार संतापले, म्हणाले- ‘हा तालिबानी फतवा…’
•मुंबईत शिवसेनेचे आमदार Pratap Sarnaik यांनी कॉलेजांमध्ये ‘ड्रेस कोड’ लागू करण्याच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. महाराष्ट्र विधानभवनात त्यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
मुंबई :- विद्यार्थ्यांना जीन्स आणि टी-शर्ट घालण्यापासून रोखणाऱ्या मुंबईतील महाविद्यालयावर कारवाई करण्याची मागणी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी बुधवारी केली. चेंबूर ट्रॉम्बे एज्युकेशन सोसायटीच्या एन. होय. आचार्य आणि डी च्या मराठा कॉलेजने 27 जून रोजी विद्यार्थ्यांना फाटलेल्या जीन्स, टी-शर्ट, ‘अप्रतिष्ठित’ कपडे आणि जर्सी किंवा “धर्म किंवा सांस्कृतिक असमानता दर्शविणारा कोणताही पोशाख घालण्यास बंदी घातली आहे. या सर्व प्रकारच्या बाबत शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले आहे.
Pratap Sarnaik यांचे पत्र जशास तसे..
विद्यार्थी शालेय शिक्षण पुर्ण करून पुढील शिक्षणासाठी महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर ड्रेस कोड नसल्यामुळे रोज वेगवेगळे फॅशनेबल कपडे घालायला मिळणार या वेगळ्याच भावविश्वात असतो. मुंबईतील चेंबूर विभागात एन.जी. आचार्य आणि डि.के. मराठे कॉलेज असून या कॉलेजमध्ये चेंबूरमधील घाटला, गोवंडी, घाटकोपर या भागातून मोठ्या संख्येने विद्यार्थी शिक्षणासाठी कॉलेजमध्ये प्रवेश घेतात. आचार्य मराठे कॉलेजच्या व्यवस्थापनाने अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना ड्रेसकोडसंदर्भात विशेष नियमावली जारी केली असून त्यानुसार जीन्स, टी-शर्ट आणि जर्सी घालून महाविद्यालयात येण्यास बंदी घातल्यामुळे महाविद्यालय प्रशासनाने निश्चित केलेला गणवेश परिधान करूनच विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये प्रवेश दिला जात आहे.
भारतातील 70 ते 80 टक्के तरूण पिढी ही जीन्स-टी-शर्ट परिधान करतात. गेल्या वर्षी एका कॉलेजच्या व्यवस्थापनाने बुरखा, हिजाब परिधान करण्यावर बंदी घातली. या निर्णयावर काही विद्यार्थीनींनी आक्षेप घेऊन उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानुसार आचार्य मराठे कॉलेजच्या व्यवस्थापनाने विद्यार्थ्यांनी जीन्स, टी-शर्ट आणि जर्सी घालून कॉलेजमध्ये प्रवेश करण्यास बंदी घातल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आक्रोश पहायला मिळाला. त्यामुळे याचे लोण राज्यातील इतर महाविद्यालयांमध्ये पसरून विद्यार्थ्यांमध्ये असंतोष निर्माण होऊन ठिकठिकाणी आंदोलन होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आचार्य मराठे कॉलेजच्या व्यवस्थापनाने घेतलेला सदरहू निर्णय हा विद्यार्थ्यांच्या मुलभूत अधिकारांवर गदा आणणारा आहे. यासाठी आपण मुख्यमंत्री या नात्याने मध्यस्थी करून आचार्य मराठे कॉलेजच्या व्यवस्थापनाने घेतलेल्या निर्णयावर बंदी आणावी व विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा, ही नम्र विनंती,