मुंबई
Trending

Pratap Sarnaik : महाराष्ट्राच्या मंत्र्याने घेतली देशातील पहिली ‘टेस्ला’ कार!

Pratap Sarnaik Buy First Tesla Car : ‘टेस्ला’च्या भारतीय बाजारातील प्रवेशानंतर पहिला ग्राहक महाराष्ट्राचाच!

मुंबई :- जगातील सर्वात लोकप्रिय आणि अत्याधुनिक इलेक्ट्रिक कार कंपनी ‘टेस्ला’ (Tesla) ने भारतात आपला प्रवेश केला असून, त्यांची पहिली कार खरेदी करण्याचा मान महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मिळवला आहे. 15 जुलै रोजी मुंबईतील बीकेसी येथे टेस्लाच्या शोरूमचे उद्घाटन झाल्यानंतर, आज 5 सप्टेंबर रोजी टेस्लाने देशभरात गाड्यांच्या वितरणाला सुरुवात केली. यात पहिलीच गाडी खरेदी करून सरनाईक Pratap Sarnaik यांनी देशात एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून प्रताप सरनाईक यांनी देशातील पहिली टेस्ला कार घेण्याचा आपला मानस व्यक्त केला होता. तो प्रत्यक्षात उतरवून त्यांनी टेस्लाची कार विकत घेतली. विशेष म्हणजे, कोणत्याही सवलतीशिवाय (discount) पूर्ण रक्कम भरून ही कार त्यांनी खरेदी केली आहे. या घटनेमुळे महाराष्ट्राचे नाव टेस्लाच्या भारतीय इतिहासाशी जोडले गेले आहे.

अत्याधुनिक, सुरक्षित आणि प्रदूषणमुक्त गाडीचा संदेश देणार नातवाला भेट

या वेळी बोलताना प्रताप सरनाईक म्हणाले, “भारतातील सर्वात पहिली टेस्ला कार मला विकत घेता आली, याचा मला अभिमान आहे. ही कार मी माझ्या मुलाला नाही, तर माझ्या नातवाला देत आहे. तो शाळेत ही कार घेऊन जाईल आणि सर्वांना प्रदूषणमुक्त आणि पर्यावरणपूरक वाहनाचा संदेश देईल.”

टेस्ला कंपनीची कार तिच्या सुरक्षिततेसाठी आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानासाठी जगभरात ओळखली जाते. टेस्लाच्या या प्रवेशामुळे भारतीय इलेक्ट्रिक वाहन बाजारात मोठी स्पर्धा निर्माण होण्याची शक्यता आहे. प्रदूषण नियंत्रणासाठी आणि पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी इलेक्ट्रिक वाहने ही काळाची गरज बनली आहे. या दिशेने प्रताप सरनाईक यांनी उचललेले हे पाऊल नक्कीच कौतुकास्पद आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0