मुंबई
Trending

Prashant Thakur : विकासकामांचा झंझावात पुढील काळातही सुरू ठेवण्यासाठी कमळ चिन्हासमोरील बटन दाबून विजयी करा – आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल जितिन शेट्टी : राज्यात महायुतीचे सरकार हे विविध योजना राबवून त्याचा लाभ नागरीकांना देत आहे. त्यामुळे जनतेची सेवा करणारे महायुती सरकार पुन्हा सत्तेत आणा आणि पनवेल मध्ये ज्या वेगाने विकासाची कामे झाली तोच विकासकामांचा झंझावात पुढील काळातही सुरु ठेवण्यासाठी येत्या २० तारखेला राज्य आणि देशाच्या विकासाची निशाणी असलेल्या कमळ चिन्हा समोरील बटन दाबून मला विजयी करा असे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर यांनी कामोठे येथे झालेल्या प्रचारावेळी मतदारांना केले. आमदार प्रशांत ठाकूर यांचा प्रचार कामोठे, नौपाडा आणि जुई गावात झाला. यावेळी महायुतीच्या पदाधिकारी, आणि कार्यकर्त्यांसह जनतेचा लक्षणीय प्रतिसाद लाभला. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, आरपीआय, पीआरपी आणि मित्रपक्ष महायुतीचे पनवेल मतदार संघाचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर Prashant Thakur यांचा प्रचाराचा झंझावात सुरु आहे. त्यानुसार कामोठे, नौपाडा आणि जुईगावात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली झाली. या रॅली दरम्यान त्यांना जनतेचा आर्शिवाद मिळाला. या प्रचारावेळी शिवसेना पनवेल जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे, पनवेल विधानसभा संयोजक व भाजपचे उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, कामोठे शहर अध्यक्ष रवींद्र जोशी, पनवेल महापालिकचे माजी नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत, गोपीनाथ भगत, विकास घरत, दिलीप पाटील, विजय चिपळेकर, माजी नगरसेविका अरुणा भगत, कुसूम म्हात्रे, रविंद्र म्हात्रे, के. के. म्हात्रे, भाऊ भगत, प्रदिप भगत, राजेश गायकर, सुधाकर पाटील, हॅप्पी सिंग, महेंद्र भोपी, सचिन गायकवाड, हर्षवर्धन पाटील, ऍड. आशा भगत, महिला मोर्चाच्या कामोठे मंडल अध्यक्षा वनिता पाटील, युवामोर्चा कामोठे शहर अध्यक्ष तेजस जाधव यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0