कोल्हापूरमहाराष्ट्र

Prashant Koratkar : छत्रपती शिवाजी महाराजांच्या अवमान प्रकरणी प्रशांत कोरटकरला 3 दिवसांची पोलिस कोठडी

Prashant Koratkar Latest News : न्यायालय परिसरात शिवप्रेमी आक्रमक

कोल्हापूर :- छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अपमानास्पद विधान करणाऱ्या फरार प्रशांत कोरटकरला अखेर पोलिसांनी तेलंगणातील मंचारियालमधून ताब्यात घेतले होते.त्यानंतर न्यायालच्या वतीने कोरटकरला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. Prashant Koratkar Latest News आरोपी प्रशांत कोरटकर यांने त्याच्या मोबाईल मधील डाटा डिलीट केला आहे. असे त्याने का केले? तसेच हा आरोपी एक महिना फरार होता. या काळात त्याला कोणी मदत केली? याचा देखील तपास करणे गरजेचे असल्याचा दावा सरकारी वकील यांनी न्यायालयात केला होता.

दरम्यान जुना राजवाडा परिसरात नागरिक हातात कोल्हापुरी चपला घेत दाखल झाले होते. कोरटकरला कोल्हापुरी चपलेने प्रसाद दिल्याशिवाय शिवप्रेमी शांत बसणार नसल्याचे त्यांचे म्हणणे होते. त्याला पोलिसांचे संरक्षण देण्यात येत आहे. तो काय सरकारचा जावाई आहे का? असा प्रश्न येथील नागरिकांनी उपस्थित केला.

प्रशांत कोरटकरवर इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकी दिल्याचा व छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पोलिस गत 25 फेब्रुवारीपासून त्याचा शोध घेत होते. पण तो पोलिसांना गुंगारा देत होता. अखेर पोलिसांनी सोमवारी त्याला तेलंगणातून ताब्यात घेतले. तेलंगणात त्याच्या अटकेची योग्य ते सोपस्कार पार पाडल्यानंतर त्याला कोल्हापुरात आणले गेले. प्रशांत कोरटकरवर कोल्हापूरच्या जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्यामुळे त्याला तिथे आणले गेले आहे. आज त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0