Prasad Parabh : सीआयएसएफच्या जवानांकडून खारघर शिवसेना शिंदे गटाच्या शहरप्रमुख प्रसाद परब यांना मारहाण
नवी मुंबई जितिन शेट्टी : वाहनचालकाला जाब विचारल्याने सीआयएसएफच्या दहा ते पंधरा जवानांनी शिवसेना शिंदे गटाच्या शहर प्रमुखासह दोघांना मारहाण केली. याप्रकरणी खारघर पोलिस ठाण्यात Kharghar Police Station शुक्रवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खारघर सेक्टर २० मध्ये राहणारे डॉ. श्रीनाथ परब, मित्र जयेश, भाऊ प्रसादसह रात्री दहाच्या सुमारास कारने घरी परतत होते. खारघरमधील प्रणाम हॉटेल समोर सीआयएसएफच्या जवानांना घेऊन जाणाऱ्या बसवरील चालकाने डाव्या बाजूला अचानक गाडी वळवली. याप्रकाराचा डॉ. श्रीनाथ यांनी काही अंतर पुढे गेल्यावर जाब विचारला. पण त्याचा राग आल्याने गणवेशात असलेल्या दहा ते पंधरा जवानांनी वाहनातून खाली उतरत तिघांना बेदम मारहाण केली. यावेळी गाडीत अकरा महिन्याचा बाळासह त्याची आईदेखील होती.
प्रसाद परब म्हणाले की, सीआयएसएफच्या दहा ते पंधरा जवानांनी मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यावेळी मारहाण करणाऱ्या जवानांना वाटसरूंनी गाडीत लहान मुलगा आणि महिला असल्याची माहिती दिली. मात्र, त्याकडेही जवानांनी दुर्लक्ष केले. तसेच मारहाण करणारे सर्व जवान दारूच्या नशेत होते.