Prasad Lad : भाजप आमदार प्रसाद लाड यांचा मनोज जरांगे पाटील यांना पुन्हा एकदा सल्ला देणारा व्हिडिओ
Prasad Lad On Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना आरक्षणाच्या मुद्द्याबाबत प्रश्न विचारल्याबद्दल त्यांचे स्वागत ; आमदार प्रसाद लाड
मुंबई :- भाजपाचे आमदार प्रसाद लाड Prasad Lad यांनी पुन्हा एकदा व्हिडिओ करत मराठा आरक्षणासाठी लढा देणाऱ्या मरत जरांगे पाटील यांना सल्ला दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटील Manoj Jarange Patil हे सातत्याने भाजपाच्या नेत्यांवर निशाणा साधताना दिसत आहे त्यामध्ये प्रामुख्याने देवेंद्र फडणवीस, प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर यांच्यावर सातत्याने जरांगे पाटील यांच्याकडून टीका केली जात आहे. जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा नाव न घेता प्रसाद लाडाने प्रवीण दरेकर यांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.मनोज जरांगे पाटील यांचा आरक्षण हा विषय आहे. त्यांनी आरक्षणावर चर्चा करावी, असे म्हणत भाजप नेते प्रसाद लाड यांनी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांना प्रत्युत्तर दिले आहे. मागच्या दाराने येणारे नेते पक्ष बुडवण्याचे काम करतात, असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी प्रसाद लाड यांच्यावर टीका केली होती. त्यावर लाड यांनी प्रत्युत्तर दिले आहे. तुमचा आरक्षण हा विषय असून तुमच्या आरक्षणाच्या मागणीला आमचा पाठिंबा आहे. या साठी आम्ही तुमच्या सोबत आहोत, असे देखील प्रसाद लाड यांनी म्हटले आहे. Manoj Jarange Patil Latest News
शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पटोले यांना आरक्षणाविषयी तुम्ही प्रश्न विचारला. तसेच त्यांची भूमिका स्पष्ट करण्याचे आवाहन केले. याबद्दल आम्ही तुमचे अभिनंदन करतो. आता तुम्ही उपोषण करत नाही आहात, त्यामुळे तुमचे मानसिक संतुलन चांगले असेल. अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली. मात्र, मानसिक संतुलन बिघडल्यानंतर तुम्हाला दरेकर आणि लाड आठवत असेल तर पुन्हा एकदा चर्चा करा, असे आवाहन देखील त्यांनी केले. Manoj Jarange Patil Latest News
देवेंद्र फडणवीस यांचे नेमके चुकले काय? असा प्रश्न आम्ही त्यांना विचारला होता. मात्र, या प्रश्नाचे उत्तर त्यांच्याकडे नाही. मराठा समाजाला देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षण दिले हे त्यांच्या चुकले का? ते आरक्षण न्यायालयात टिकवले हे देखील चुकले का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. या प्रश्नाचे उत्तर मनोज जरांगे पाटील यांच्याकडे नसल्याचे देखील प्रसाद लाड यांनी म्हटले आहे.
आम्ही मागच्या दाराने आलो असेल किंवा पुढच्या दाराने आलो असेल, त्याच्याशी तुमचे काय? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. तुम्हाला जर इच्छा असेल तर त्यांनी तुम्ही 288 विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवा. आणि नंतर मागच्या दाराने, पुढच्या दाराने, छतावरून कुठूनही सभागृहात या, असे आवाहन देखील प्रसाद लाड यांनी मनोज जरांगे पाटील यांना केले आहे.