ठाणे

Prakash Mahajan : “काही लोक ‘औषध’ घेऊन लवकर झोपतात, पण शिंदे रात्री 12 लाही भेटतात”; प्रकाश महाजनांचा राज ठाकरेंना बोचरा टोला

Prakash Mahajan On Raj Thackeray : “अंधारात एकटे जाण्यापेक्षा दोघे भाऊ एकत्र जातायत, पण नशिबी अंधारच”; महाजनांचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल

ठाणे | मनसेच्या प्रवक्तेपदाचा राजीनामा देऊन शिवसेनेत (शिंदे गट) दाखल झालेले प्रकाश महाजन यांनी आपल्या पहिल्याच भाषणात ठाकरे बंधूंच्या युतीवर तोफ डागली आहे. “दोन्ही बंधूंनी हिंदुत्व सोडले असून, आगामी महापालिका निवडणुकीत जागावाटप जाहीर होताच त्यांच्यासोबत कोणीही उरणार नाही,” अशी घणाघाती टीका महाजन यांनी केली.

राज ठाकरेंवर वैयक्तिक टीका

प्रकाश महाजन यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला. ते म्हणाले की, “एकनाथ शिंदे हे खऱ्या अर्थाने कार्यकर्त्यांचे नेते आहेत. ते रात्री कितीही वाजता कार्यकर्त्यांना भेटतात. मी गुरुवारी रात्री त्यांना भेटलो, तेव्हाही ते तितक्याच उत्साहात होते. मात्र, महाराष्ट्रात असे काही नेते आहेत जे रात्री लवकर ‘औषध’ घेऊन झोपतात.” महाजन यांच्या या विधानाने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

ठाकरे बंधूंच्या युतीवर प्रश्नचिन्ह

राज आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्यावर भाष्य करताना महाजन यांनी विचारले.”20 वर्षांचा दुरावा अवघ्या 10 मिनिटांच्या चर्चेत संपतो का? हे केवळ सत्तेसाठी केलेले मनोमिलन आहे. “कुणी कंबरेवर हात ठेवून उभे राहिले म्हणजे कुणाचा वारस होऊ शकत नाही. एकनाथ शिंदेंनी आपल्या कामातून बाळासाहेबांचा वारसा सिद्ध केला आहे. “यांना फक्त मुंबई, ठाणे आणि नाशिक या तीनच महापालिकांमध्ये रस आहे. बाकी महाराष्ट्रातील मराठी माणसाचे यांना काहीही देणेघेणे नाही.”

एकनाथ शिंदेंचे ‘हिंदुत्व’ आणि कार्यपद्धती

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कौतुक करताना प्रकाश महाजन भावूक झाले. “एखादे गाव अतिवृष्टीमध्ये वाहून जात असताना राज्याचा मुख्यमंत्री रात्री दीड वाजता तिथे पोहोचतो, हे महाराष्ट्राने पहिल्यांदाच पाहिले आहे. काही मुख्यमंत्री असे होऊन गेले ज्यांनी कधी मातोश्री सोडली नाही, जे परीक्षेला बसले नाहीत पण पहिले आले,” असा टोला त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.

“मी शिंदेंचा ‘राजदूत'”

आपल्या पक्षप्रवेशाचे श्रेय त्यांनी उपमुख्यमंत्र्यांचे आरोग्य दूत मंगेश चिवटे यांना दिले. “चिवटे हे आरोग्य दूत असले तरी माझ्यासाठी ते राजदूत ठरले आहेत. शिंदे साहेबांनी मला नेता न समजता कार्यकर्ता म्हणून वागणूक दिली, हेच त्यांचे मोठेपण आहे,” असेही महाजन यांनी नमूद केले.

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

4 hours ago